Anil Deshmukh News : अनिल देशमुखांच्या प्रस्तावाचे मुख्यमंत्री फडणवीस काय करणार?

Overview of the Wainganga-Nalganga River Linking Project : वैनगंगा-नळगंगा नदी जोड प्रकल्प हा विदर्भातील महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या माध्यमातून नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला व बुलढाणा या सहा जिल्हातील एकूण 3 लाख 71 हजार 277 हेक्टर क्षेत्रास सिंचन उपलब्ध होणार आहे.
Anil Deshmukh, Devendra Fadnavis
Anil Deshmukh, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Nagpur Politics : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भातील दुष्काळ संपवण्यासाठी ‘वैनगंगा-नळगंगा नदी जोड प्रकल्प' जाहीर केला आहे. सुमारे 80 हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पाला काटोल-नरखेड तालुक्यांची जोड देऊन तो पुढे नेण्यात यावा, अशी मागणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. महविकास आघाडी सरकार पाडल्याचा आरोप करणाऱ्या देशमुखांच्या या प्रस्तावाला फडणवीस कसा प्रतिसाद देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वैनगंगा-नळगंगा नदी जोड प्रकल्प हा विदर्भातील महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या माध्यमातून नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला व बुलढाणा या सहा जिल्हातील एकूण 3 लाख 71 हजार 277 हेक्टर क्षेत्रास सिंचन उपलब्ध होणार आहे. वैनगंगा नदीवरील गोसीखुर्द जलाशयातून पाणी उचलून बुलढाणा जिल्हयातील नळगंगा धरणापर्यंत एकूण 426 किलोमीटर लांबीचा कालवा असणार आहे, असे देशमुखांनी म्हटले आहे.

Anil Deshmukh, Devendra Fadnavis
Medha Patkar Arrest : मोठी बातमी : मेधा पाटकर यांना अटक, 25 वर्षांपूर्वीच्या प्रकरणात झटका

प्रकल्पात विदर्भातील संत्रा पिकाकरिता प्रसिध्द असलेल्या वरुड, मोर्शी, काटोल, नरखेड या तालुक्यांचा समावेश करावा, अशी मागणी देशमुख यांनी केली आहे. वरुड, मोर्शी, काटोल, नरखेड या भागातील भुजल पातळी ही 8000 फुटांपेक्षा खाली गेल्यामुळे या क्षेत्रास डार्क झोन संबोधल्या जाते, अशी माहिती देशमुखांनी फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात दिली आहे.

या भागात पूर्वी मोठया प्रमाणात संत्रा व मोसंबीची लागवड करण्यात येत होती. पाण्याच्या अभावी संत्रा व मोसंबी बागा वाळत असून लागवडीचे क्षेत्रफळसुध्दा मोठया प्रमाणात कमी झाले आहे. वैनगंगा-नळगंगा नदी जोड योजनेंतर्गत या क्षेत्राचा समावेश करून या क्षेत्रातील भूजलाची पातळी वाढविण्याबाबत प्राधान्याने विचार होणे आवश्यक असल्याचे देशमुखांनी सांगितले.

Anil Deshmukh, Devendra Fadnavis
Pahalgam attack survivors : पाय फ्रॅक्चर असताना आठ किलोमीटर धावत सुटल्या सिमरन; पहलगाम हल्ल्यातून बचावलले रुपचंदानी कुटुंब नागपूरमध्ये परतले

योजनेत विदर्भातील संत्रा पिकाकरिता प्रसिध्द असलेल्या आणि सिंचनासाठी पाण्याची आवश्यकता असताना काटोल, नरखेड, वरुड, मोर्शी या तालुक्यांचा समावेश करण्यात आला नाही. यामुळे या भागाचा वैनगंगा-नळगंगा नदी जोड प्रकल्पामध्ये समावेश करावा, अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com