Anil Deshmukh: स्मार्ट मीटरच्या शून्य रिडिंगनंतरही 11 हजाराचे वीज बिल, लूटमारीविरोधात अनिल देशमुख आक्रमक

Nagpur News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी महायुती सरकारसह वितरणच्या स्मार्ट मीटर विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत स्मार्ट मीटरचा मुद्दा चांगलाच तापणार असल्याचे दिसून येते.
Anil Deshmukh
Anil Deshmukh sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी स्मार्ट मीटर लावण्यात येणार नाही अशी घोषणा महायुती सरकारने केली. निवडणूक जिंकताच आपल्या लाडक्या उद्योगपतीच्या कंपनीला मागच्या दाराने मीटर लावण्याची परवानगी महायुती सरकराने दिली आहे. हे मीटर अचूक नोंद करते असा दावा केला जात आहे. पण आता दोन हजार रुपयांचे वीज बिल 28 हजार रुपये कसे काय यायला लागले, असा सवाल माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी महायुती सरकारसह वितरणच्या स्मार्ट मीटर विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत स्मार्ट मीटरचा मुद्दा चांगलाच तापणार असल्याचे दिसून येते.

स्मार्ट मीटरच्या आड सामान्य नागरिकांची एकप्रकारे भाजप सरकार लूट केली जात आहे. नागरिकांचा या स्मार्ट प्रीपेड मीटरला विरोध आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने या विरोधात राज्यभर आंदोलन केले होते. त्यानंतर विद्यमान मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत स्मार्ट मीटर लावण्यात येणार नाही असे आश्वासन दिले होते.

2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात ते हेच बोलले होते. असे असताना कंपनीचे कर्मचारी घरोघरी जाऊन मीटर लावण्याची सक्ती करीत आहेत. अनेकांच्या घरांमध्ये जुने मीटर तोडण्यात आले आहे. आज नरखेड येथे स्मार्ट मीटर लावल्यानंतर अवाढव्य वीज बिलाने शेतकरी हैराण झाले आहेत. त्यांनी आमदार चरणसिंग ठाकूर यांना याचा जाब विचारला.

Anil Deshmukh
Sharad Pawar: 'कर्णानंतर दुसरे दानशूर म्हणजे...!'; शरद पवारांच्या 'या' लाडक्या आमदाराकडून एकनाथ शिंदेंचं तोंडभरून कौतुक

काही दिवसांपूर्वी महावितरणचा वर्धापन दिन कार्यक्रमात कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी मार्च 2026 पर्यंत राज्यात सर्वत्र स्मार्ट मीटर लावण्याचे टार्गेट पूर्ण करणार असल्याचे वक्तव्य केले. तसेच राज्यात यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

हे बघता महावितरणच्यावतीने स्मार्ट लावण्याचा सक्तीने सपाटा सुरू झाल्याचे दिसून येते. ज्यांच्याकडे हे मीटर लावले त्यांचे आधीचे बिल व स्मार्ट मीटर लावल्यानंतर आलेले बिल या मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. बंद असलेल्या घरात मीटर लावल्यानंतर शून्य रीडिंग असताना 11 हजार रुपयाचे बिल पाठविण्यात आले आहे, याकडे अनिल देशमुख यांनी लक्ष वेधले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com