Anil Deshmukh : कोणी लहान-मोठा भाऊ नाही; लोकसभेनंतर अनिल देशमुखांचा कॉन्फिडन्स वाढला

former home minister Anil Deshmukh statement : विधानसभेत जागा वाढवून घेण्याचा प्रश्नच उद्‍भवत नसल्याचे सांगून माजी गृहमंत्री व शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी सांगितले. हे सांगताना त्यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसलाही सुनावले.
Anil Deshmukh
Anil DeshmukhSarkarnama

Nagpur News : लोकसभेच्या निवडणुकीत महविकास आघाडीला मोठे यश मिळाले आहे. विजयाचे श्रेय आता घेऊन विधानसभेसाठी जागा वाढवून घेण्यासाठी आघाडीतील घटकपक्षांमध्ये स्पर्धा लागली आहे. याकरिता लहान भाऊ मोठा भाऊ असे दावे केले जात आहेत. यावर भाष्य करताना अनिल देशमुख म्हणाले, महाविकास आघाडी लोकसभा निवडणूक एकोप्याने लढली होती.

आमचे एकूण 31 खासदार निवडून आले आहेत. विजयात सर्वांचाच वाटा आहे. मोठा आणि लहान भाऊ असे कोणी नव्हते आणि नाही. सर्व सारखेच आहेत. त्यामुळे मुद्दाम मोठ्या भावाचा वाद उकरून काढून विधानसभेत जागा वाढवून घेण्याचा प्रश्नच उद्‍भवत नसल्याचे सांगून माजी गृहमंत्री व शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी सांगितले. हे सांगताना त्यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसलाही सुनावले.

Anil Deshmukh
Shyamkumar Barve : नवनिर्वाचित खासदार श्यामकुमार बर्वेंनी पहिलं पाऊल देशमुखांच्या काटोलात का ठेवलं?

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे फोनवर उपलब्ध असतात. आमची त्यांच्याविषयी कुठलीच नाराजी नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दोन दिवसांपूर्वीच विधान परिषदेच्या जागा वाटपच्या वेळी उद्धव ठाकरे फोन उचलत नसल्याची तक्रार केली होती. याकडे लक्ष वेधले असता देशमुख यांनी आमची तक्रार नसल्याचे स्पष्ट केले. विधानसभेची निवडणूक ऑक्टोबरमध्ये लागण्याची शक्यता आहे.

लोकसभेप्रमाणेच महाविकास आघाडी ही निवडणूक एकत्रितपणे लढणार आहे. आपसात बसून जागावाटप केले जातील आणि शंभर टक्के जागा निवडूण आणू. आगामी सरकार महाविकास आघाडीच येणार असल्याचा दावाही देशमुखांनी पत्रकारांसोबत बोलताना केला. महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी कुठलेही निर्णय घेतले नाही. फक्त फोडाफोडीचा राजकारण केले.

Anil Deshmukh
Pune Porsche Accident : 'त्या' तरुण- तरुणीला मद्यधुंद दाखवण्याचा प्रयत्न अनिल देशमुखांचा खळबळ जनक दावा

ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचेही घर फोडण्यात आले. त्यांचा पक्षही फोडण्यात आला. आम्ही मतदारांसोबत प्रामाणिक राहिले. त्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडले. यामुळे सुप्रिया सुळे यांच्यासह आमचे उमेदवार मोठ्या प्रमाणात निवडूण आले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत. त्यांच्या नावावरून कुठलेच वाद व मतभेद पक्षात नाही. आमच्या पक्षात निर्णय शरद पवार घेतात,'असेही देशमुख म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com