Nagpur Winter Session : विधान भवनाजवळ शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; स्थगन प्रस्ताव नाकारला

Anil Deshmukh : घाईत अधिवेशन गुंडाळण्याच्या विषयावर विरोधक पुन्हा आक्रमक
Anil Deshmukh on Vidhan Bhavan Farmer Case.
Anil Deshmukh on Vidhan Bhavan Farmer Case.Google
Published on
Updated on

Vidhan Sabha : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू असताना विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ किटकनाशक पिऊन सचिन उत्तम बहादुरे (वय 29) या युवा शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. ‘सरकारनामा’ने हे वृत्त प्रकाशित करताच विधिमंडळात या घटनेचे पडसाद उमटले.

विधानसभेत या विषयावर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्थगन प्रस्ताव मांडला. सभागृहाचे कामकाज थांबवित देशमुख यांनी यासंदर्भात तातडीने शासनाने निवेदन करावे, अशी मागणी केली.

Anil Deshmukh on Vidhan Bhavan Farmer Case.
Nagpur Winter Session: शेतकऱ्याकडून आत्महत्येचा प्रयत्न; सरकारकडून लपवाछपवी?

केवळ दहा दिवसांच्या अधिवेशनामुळे विदर्भातील विशेष: शेतकऱ्यांबाबतच्या प्रश्नांवर कोणतीही चर्चा झाली नाही, याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अधिवेशनाचे सूप वाजण्याच्या आदल्या दिवशी नागपूर येथे युवा शेतकरी येतो आणि विधान भवनात आत्महत्येचा प्रयत्न करतो हा प्रकार गंभीर असल्याचे अनिल देशमुख यांनी विधानसभेच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे अध्यक्षांनी तातडीले स्थगन प्रस्ताव मंजूर करीत शेतकरी आत्महत्या या विषयावर चर्चा करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी देशमुख यांनी केली.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा स्थगन प्रस्ताव नाकारला. त्यामुळे देशमुखांनी संताप व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सरकार गंभीर नसेल तर नागपुरात हिवाळी अधिवेशन घेण्याचा फायदाच काय, असा सवाल करीत त्यांनी सभागृहाबाहेर संताप व्यक्त केला. यवतमाळ जिल्ह्यातील मोरथ जहागीर या गावातील रहिवासी सचिन बहादुरे यांनी मंगळवारी विषारी द्रव्य प्राशन करीत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. विदर्भात सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांसाठी यवतमाळ जिल्ह्याचे नाव सर्वांत वर आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सरकार शेतीमालाला योग्य भाव देत नसल्याने शेतकऱ्यांना प्रचंड त्रासाचा सामना करावा लागत आहे. शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने आपण जीव देत असल्याची घोषणा सचिन यांनी केली. त्यानंतर तातडीने त्यांनी खिशातील कीटकनाशकाची बाटली काढली व त्यातील द्रव्य प्राशन केले. काही सेकंदातच सचिन हे मुख्य प्रवेशद्वाराजवळ कोसळले.

विधान भवनात तैनात पोलिसांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ हा प्रकार घडल्याने प्रकरण अंगावर येऊ नये यासाठी अधिकाऱ्यांनी हे प्रकरण दडपण्याचा पूर्ण प्रयत्न केला. ‘सरकारनामा’ने यासंदर्भातील माहिती मिळताच वृत्त प्रकाशित केले. त्यामुळे विधिमंडळात त्याचे पडसाद उमटले. सरकारने विधिमंडळात सचिन बहादुरे यांच्यासंदर्भातील स्थगन प्रस्ताव नाकारला असला तरी सभागृहाबाहेर विरोधी पक्षातील नेते हा मुद्दा उचलत आंदोलन करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Edited by : Prasannaa Jakate

Anil Deshmukh on Vidhan Bhavan Farmer Case.
Nagpur Winter Session : सरकारला विदर्भाचे प्रश्नच सोडवायचे नाहीत; वडेट्टीवारांचा आरोप

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com