Akola District APMC News: सहकार क्षेत्रातील राजकीय डावपेचांना खऱ्या अर्थाने झाली सुरुवात..

Akola : सातही बाजार समित्यांमधील लढतीचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे.
Akola District
Akola DistrictSarkarnama
Published on
Updated on

जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय डावपेचांना बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने सुरुवात झाली आहे. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवसानंतर जिल्ह्यातील सातही बाजार समित्यांमधील लढतीचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेच्या सहकार पॅनलतर्फे युती करून निवडणूक लढविण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याने जिल्ह्यात सर्व बाजार समितीमध्ये दुहेरी लढती होण्याची शक्यता आहे.

मूर्तिजापूरमध्ये दोन अविरोध; ४४ उमेदवार रिंगणात..

मूर्तिजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी व्यापारी मतदारसंघातून पाच जणांनी माघार घेतली. त्यामुळे दोन जागांसाठी दोनच अर्ज शिल्लक राहिल्याने ते अविरोध झाले आहेत. उर्वरित जागांसाठी ४४ उमेदवार रिंगणात आहेत. सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघातून ३२ पैकी १० अर्ज मागे घेतल्याने २२ उमेदवार रिंगणात आहेत.

ग्रामपंचायत मतदारसंघात ३१ अर्जांपैकी १५ जणांनी माघार घेतल्याने १७ उमेदवार रिंगणात आहेत. हमाली माथाडी मतदारसंघात सहा पैकी एक अर्ज मागे घेण्यात आल्याने पाच उमेदवार रिंगणात आहेत.

पातूरमध्ये एक अविरोध, ४० उमेदवार लढवणार निवडणूक..

पातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सेवा सहकारी संस्था मतदार संघातील ५९ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. त्यांपैकी १९ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून, आता ४० उमेदवार प्रत्यक्ष निवडणूक लढवणार आहेत. १७ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत वर्चस्व स्थापन करण्यासाठी सहकार पॅनल शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांनी युती केली आहे.

शेतकरी (Farmers) पॅनल त्यांच्या विरोधात असणार आहे. त्यामुळे एकास एक अशी लढत असणार आहे. बाजार समितीची निवडणूक ही जरी राजकीय पक्षांच्या चिन्हावर लढवली जात नसली तरी राजकीय पक्ष आपले उमेदवार कसे निवडून येतील, यासाठी प्रयत्न करणार आहेत. नामनिर्देशन दाखल करताना हमाल मापारी मतदारसंघातून दोन उमेदवारांनी आपली नामनिर्देशन पत्र दाखल केले होते.

एका उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतल्यामुळे हमाल मापारी संघातून शेख मुख्तार शेख नजीम अविरोध झाले आहेत. आता राजकीय (Political) पक्ष आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी व आपले वर्चस्व बाजार समितीत स्थापित करण्यासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावणार आहेत.

Akola District
APMC Arni : मविआतील असंतुष्ट, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आणि आणि भाजप-शिंदे गटांत होणार तुंबळ लढाई !

बाळापूरमध्ये ३५ जणांची माघार, एक अविरोध..

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी (APMC Election) एकूण ७३ अर्ज प्राप्त झाले होते. त्यांपैकी ३५ जणांनी माघार घेतली. त्यामुळे आता येथे ३८ उमेदवार रिंगणात आहेत. सेवा सहकारी सोसायटी गटात एकूण २३ उमेदवार रिंगणात आहेत. ग्रामपंचायतीमध्ये एकूण नऊ उमेदवार रिंगणात असून हमाली व माथाडी मतदारसंघात एकच अर्ज असल्याने बिनविरोध करण्यात आला आहे. व्यापारी अडते मतदारसंघात एकूण पाच उमेदवार रिंगणात आहेत.

Akola District
APMC Mahagaon : महागाव बाजार समितीत राष्ट्रवादीच्या विरोधात सर्वपक्षीयांची वज्रमूठ !

अकोल्यात ३१ उमेदवार रिंगणात..

अकोला (Akola) जिल्ह्यातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती असलेल्या अकोला बाजार समितीमध्ये १८ जागांसाठी एकूण ३१ उमेदवार रिंगणात आहेत. एकूण ९१ अर्ज प्राप्त झाले होते. त्यांपैकी सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघात एकूण १६, ग्रामपंचायत मतदारसंघात आठ, व्यापारी व अडते पाच आणि हमाल व माथाडी मतदारसंघात दोन उमेदवारांचे अर्ज आहेत.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com