Eknath Shinde Operation Tiger : ‘ऑपरेशन टायगर’ अडकलं? 6 पैकी फक्त 2 खासदार एकनाथ शिंदेंसोबत; उर्वरित 4 कुठे गायब?

Why Operation Tiger got stuck in Maharashtra politics: स्वतंत्र गट स्थापन केलेल्या सहा खासदारांपैकी दोघानीच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जात असल्याचे जाहीर केले आहे. उर्वरित चार खासदार अद्याप समोर आलेले नाही.
Eknath Shinde Operation Tiger
Eknath Shinde Operation TigerSarkarnama
Published on
Updated on

Shiv Sena split latest news: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का मानल्या जाणाऱ्या ‘ऑपरेशन टायगर’वर आता स्वतःच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे चित्र आहे. कारण पक्षातील सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केल्याची चर्चा जोरात असली, तरी त्यापैकी केवळ दोन खासदारांनीच अधिकृतपणे आपण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जात असल्याचे जाहीर केले आहे.

उर्वरित चार खासदार अद्याप समोर न आल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान आज दुपारी फुटलेले सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिवसेनेत मुंबईत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र ते दिल्लीदरम्यान पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरू होत्या. अखेर संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकरण, ओम राजेनिंबाळकर (Om Rajenimbalkar), भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय दिना पाटील या सहा खासदारांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून बाहेर पडत स्वतंत्र गट स्थापन केल्याचे समोर आले.

एकनाथ शिंदे शिवसेनेकडून (Shivsena) हे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्याचा माहोल तयार करण्यात आला. मात्र वास्तव पाहता सहा पैकी फक्त दोनच खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि ओम राजेनिंबाळकर यांनीच अधिकृतपणे आपण शिंदे शिवसेनेसोबत जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे उर्वरित चार खासदारांची भूमिका नेमकी काय, यावर मोठा सस्पेन्स निर्माण झाला आहे.

Eknath Shinde Operation Tiger
Shiv Sena UBT MPs Delhi : महाराष्ट्रात मध्यरात्रीनंतर मोठा राजकीय स्फोट? ‘ऑपरेशन टायगर’ अंतिम टप्प्यात? ठाकरेंच्या सहा खासदारांपाठोपाठ एकनाथ शिंदे दिल्लीत?

सूत्रांच्या माहितीनुसार, लोकसभा अध्यक्षांकडे स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी दोन स्वतंत्र व्हिडिओ सादर करण्यात आल्याची चर्चा आहे. त्यात पाच खासदारांचा एक गट आणि एका खासदाराचा स्वतंत्र व्हिडिओ असल्याचे बोलले जात आहे. मात्र हे व्हिडिओ अद्याप सार्वजनिक झालेले नाहीत. त्यामुळे प्रत्यक्षात गट स्थापन झाला आहे की नाही, याबाबतही संभ्रम कायम आहे.

Eknath Shinde Operation Tiger
Shiv Sena UBT MP : ठाकरेंच्या फुटलेल्या खासदाराला बक्षीस? एकनाथ शिंदेंचा ‘मास्टरप्लॅन’ काय, मंत्रिपदाची ऑफर चर्चेत!

विशेष म्हणजे, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडूनही ‘ऑपरेशन टायगर’ पूर्णपणे यशस्वी झाल्याची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. आजपासून सुरू होत असलेल्या महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील राजकीय हालचाली वेगाने वाढल्या असून शिंदे आज या संपूर्ण प्रकरणावर भाष्य करणार असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, ओम राजेनिंबाळकर आपल्या मतदारसंघात दाखल झाले असून नागेश पाटील आष्टीकर आज संध्याकाळी मतदारसंघात परतणार आहेत. पण उर्वरित चार खासदार अजूनही कुठे आहेत, ते मुंबईत कधी येणार, मतदारसंघात कधी जाणार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते अधिकृतपणे शिंदे गटात जाणार असल्याची घोषणा कधी करणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. सध्या सर्वात मोठा प्रश्न एकच, ‘ऑपरेशन टायगर’ खरोखर यशस्वी झालंय की अजूनही राजकीय खेळी बाकी आहे?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Eknath Shinde
Sanjay Raut | Uddhav Thackeray
Sanjay Raut  Operation Tiger | Shiv Sena MPs Defection |
Operation Tiger Maharashtra
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com