Congress Protest : काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी फरपटत नेले; नागपुरात नेमकं काय झालं ?

Winter Session Nagpur : युवक, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्षाचा आरोप
Youth Congress Protest
Youth Congress ProtestSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Winter Session 2023 : महागाई, बेरोजगारी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत, सफाई कर्मचाऱ्यांसह आदी प्रश्नांवरून शुक्रवारी राज्य युवक काँग्रेसच्या वतीने विधिमंडळावर घेराव मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, विधिमंडळावर पोहाेचण्यापूर्वीच पोलिसांनी बळाचा वापर करून हा मोर्चा मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. या वेळी पोलिसांनी आंदोलकांना हाता-पायाला धरून उचलून नेले, तर काहींना अक्षरक्षः ओढत नेल्याची चित्रे पाहायला मिळाली. पोलिसांच्या या कृतीमुळे काँग्रेस आक्रमक होण्याची शक्यता आहे.

युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास यांच्या नेतृत्वात या मोर्चाचे आयोजन केले होते. विधिमंडळावर गेलेल्या मोर्चाला पोलिसांनी अडवले. या वेळी राज्य युवक काँग्रेस प्रदेशचे अध्यक्ष कुणाल राऊतांना पोलिसांनी उचलून वाहनात बसवले. इतर पदाधिकाऱ्यांचीही बळाचा वापर करून धरपकड केली. परिणामी काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले होते. 'राज्यात बेरोजगारी वाढत आहे. शेतकऱ्यांना मदत मिळत नाही. या प्रश्नांवर आम्ही आंदोलन करताना आम्हाला उचलून नेण्यात येत आहे. हे सरकार हिटलरशाहीप्रमाणे वागत आहे,' असा घणाघात कुणाल राऊतांनी केला.

Youth Congress Protest
Nagpur Winter Session : चुलीत घाला मंत्रिमंडळ विस्तार; आमदार बच्चू कडू भडकले

युवती काँग्रेसच्या शिवानी वडेट्टीवारांनी सरकार सर्व प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला. त्या म्हणाल्या, राज्यात पेपर लीक होत आहेत. त्यातील आरोपी मोकाट आहेत. बेरोजगारी वाढत आहे. त्यातून प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनाच तुरुंगात टाकण्यात येते. युवक, शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर होत असताना निर्लज्जपणे सरकार दुर्लक्ष करत आहे, शिवानी यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आंदोलनात सहभागी झालेल्या काँग्रेसच्या नेत्यांनाही पोलिसांनी अडवले. या वेळी नाना पटोले, अतुल लोंढेसह इतर नेत्यांनी बॅरिगेट्सवर चढून घोषणाबाजी केली. राज्यात बेरोजगारी वाढून सरकार युवकांचे आयुष्य खराब करत आहे. भरतीच्या नावाखाली युवकांना लुटले. राज्यात लाखो पदे भरली जात नाहीत. कंत्राटी पद्धतीतून अनेक युवकांचे आयुष्य बरबाद केले. युवकांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन विधान भवनावर जात होते. त्याचे उत्तर सरकारला द्यावे लागेल, असा आव्हान नाना पटोलेंनी केले.

(Edited by Sunil Dhumal)

Youth Congress Protest
Shrirang Barne : मावळच्या शिरपेचात मानाचा तुरा ! श्रीरंग बारणेंना पीठासीन अधिकाऱ्याचा मान...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com