

Nagpur : काँग्रेस नेते व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे छत्रपती संभाजीनगरमधील महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला गैरहजर राहिल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. याचवरुन काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांना काँग्रेसचे नेते व प्रवक्ते अतुल लोंढे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
अतुल लोंढे(Atul Londhe) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आशिष देशमुखांवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला.
लोंढे म्हणाले, आशिष देशमुख हे पक्षातील वरिष्ठांवर नेत्यांवर सातत्यानं टीका करत असतात. यात कधी ते आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे,राहुल गांधी किंवा नाना पटोले यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांवर टीका करतात. तर त्यांचं मानसिक संतुलन तपासण्याची गरज आहे. लोकांचा त्यांना पाठिंबा नाही. पक्षविरोधी कारवाया करत आहेत त्यातून काही फायदा होईल का असे वागत आहे. त्यांचे मानसिक संतुलन गेले आहे असं लोंढे म्हणाले आहेत.
आशिष देशमुख यांचा आरोप काय?
आशिष देशमुख यांनी नाना पटोलेंवर निशाणा साधला आहे. देशमुख म्हणाले, पटोले वज्रमूठ सभेत गैरहजर होते. त्यानंतर ठणठणीत असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, मला मिळालेल्या माहितीनुसार प्रदेशाध्यक्ष सूरतच्या मार्गावर होते. सूरतच्या मार्गावर कोण असते, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. १६ तारखेला महाविकास आघाडीची नागपूरला सभा आहे. तोपर्यंत प्रदेशाध्यक्ष गुवाहाटीला पाहण्यास मिळतील. फार जबाबदारीने हे वक्तव्य करतोय असं आशिष देशमुख म्हणाले.
तसेच महिन्याचा एक खोका नाना पटोलेंना मिळत आहे. प्रदेशाध्यक्ष कधी नवीन सरकारच्या प्रमुखांवर बोलताना दिसत नाहीत, पण उपमुख्यमंत्री आणि भाजपाच्या विरोधात बोलताना सातत्याने दिसतात. याच्यामागे तो खोका कारणीभूत आहे का? अशी चर्चा मुंबईत केली जात आहे. याचे योग्य ते पुरावे देईन असंही देशमुख यांनी यावेळी सांगितले.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.