Dhirendra Shastri: धीरेंद्र शास्त्रींच्या अडचणी वाढल्या; साईबाबांविषयीच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी मुंबई पोलिसांत तक्रार

Dhirendra Shastri's controversial statement: बागेश्वर बाबांवर कडक कायदेशीर कारवाई करावी...
Dhirendra Shastri controversial statment over sai baba
Dhirendra Shastri controversial statment over sai babaSarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News: बागेश्वर बाबा उर्फ ​​धीरेंद्र शास्त्री यांनी नुकतंच साईबाबांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. साईबाबा हे देव नाहीत. ते संत आणि फकीर असू शकतात. पण देव असू शकत नाही असं विधान केलं होतं. या विधानामुळे राज्यातील राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे. मात्र, आता धीरेंद्र शास्त्री यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. यांच्याविरोधात मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) यांच्याविरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray)गटाच्या युवा सेनेनं मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. ठाकरे गट युवासेना नेते आणि शिर्डी साई संस्थानचे माजी विश्वस्त राहुल कानल यांनी ही तक्रार करण्यात आली आहे. यावेळी त्यांनी बागेश्वर बाबांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही केली आहे.

Dhirendra Shastri controversial statment over sai baba
Market Committee Election : माढ्यात शिंदे बंधूंच्या एकहाती वर्चस्वाला सावंत बंधूंचे कडवे आव्हान : संजय शिंदे, कोकाटेंसह दिग्गजांनी भरले अर्ज

राहुल कानल यांचा आरोप काय?

युवासेना नेते राहुल कानल(Rahul kanal) यांनी धीरेंद्र शास्त्री यांनी साईबाबांविषयी आक्षेपार्ह विधान करुन धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. कानल म्हणाले, धीरेंद्र शास्त्री यांनी धार्मिक भावना दुखावल्या असून या प्रकरणी त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात यावी अशी मागणी तक्रारीद्वारे केली आहे.

Dhirendra Shastri controversial statment over sai baba
Chandrakant Patil Reply to Raut : राऊतांच्या मोदींवरील टीकेवर भाजपच्या चंद्रकांत पाटलांचा पलटवार;म्हणाले...

धीरेंद्र शास्त्रीचं वादग्रस्त वक्तव्य काय?

बागेश्वर बाबा उर्फ ​​पंडीत धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी मध्यप्रदेशच्या जबलपूरमध्ये आपले परात्पर गुरु शंकराचार्यांनी साईबाबांना कधीच देवाचा दर्जा दिला नसल्याचंही ते म्हणाले होते. धीरेंद्र शास्त्री यांनी साईबाबा हे देव नाहीत. साईबाबा(Saibaba) संत आणि फकीर असू शकतात. पण देव असू शकत नाही.

आपल्या धर्मात शंकराचार्यांना सर्वात मोठं स्थान आहे. त्यांनी साईबाबांना देवांचं स्थान दिलेलं नाही. कोल्ह्याची कातडी पांघरून कोणीही सिंह बनू शकत नाही असं विधान केलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.