Mumbai News : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांच्या इनकमिंग - आऊटगोईंगला उधाण आले आहे. तसेच राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. एकमेकांवर कुरघोडीचं राजकारणही जोर धरू लागलंय. मात्र, याचवेळी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.
काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरक्षणाबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा खोटा व्हिडिओ चॅनलवर दाखवणं काँग्रेस नेते लोंढेंना भोवलं आहे. त्यांच्याविरोधात मुंबईतील सांताक्रूझ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी भाजपचे कार्यकर्ते रूपेष मालुसरे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांचा खोटा व्हिडिओ चॅनलवर दाखवल्याप्रकरणी काँग्रेस प्रवक्ते लोंढे यांच्यावर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच ही कारवाई करण्यात आल्याने काँग्रेसकडून हा मुद्दा तापवला जाण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पक्षालाच चक्रव्यूहात अडकवले आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करता करता त्यांनी आरक्षणावर केलेले विधानावर वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे आपल्या जाळ्यात काँग्रेस अडकले असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
त्यानंतर राहुल गांधींसह काँग्रेस पक्षाकडून डॅमेज कंट्रोल सुरू केले आहे.पण तरीही हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला राहुल गांधी यांच्या आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्याचा मोठा फटका बसल्याचे बोलले जात आहे.
हरियाणात काँग्रेसला सत्तेत येण्याची अपेक्षा होती. ‘एक्झिट पोल’मध्येही तशा पद्धतीचे संकेत मिळाले होते. मात्र, निकाल हाती येताच चित्र पालटलं. काँग्रेसला 37 जागा मिळाल्या. तर, भाजपनं आपलाच रेकॉर्ड मोडित काढत एकहाती सत्ता मिळवली. काँग्रेसच्या अपयशानंतर पक्षात वाद सुरू झाले आहेत. पण आमच्याच गोंधळामुळे हरियाणात काँग्रेसचा पराभव झाला, असं विधान काँग्रेसच्या बड्या नेत्यानं केलं आहे.
अमेरिकेत एका कार्यक्रमात बोलताना राहुल यांनी आरक्षणाबाबत म्हटले होते की, ‘आरक्षण थांबवण्याचा विचार काँग्रेस तेव्हाच करेल, जेव्हा भारतात पक्षपातीपणा थांबेल, पण अशी स्थिती भारतात नाही.’
या विधानावरून भाजपने राहुल यांना घेरले आहे. आरक्षण संपवण्याची काँग्रेसची सुरूवातीपासूनच मानसिकता असल्याचा हल्लाबोल भाजपने केला आहे. काँग्रेसने आता ‘डॅमेज कंट्रोल’ सुरू केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.