
Bacchu Kadu’s Unique Protest Strategy : माजी आमदार बच्चू कडू नेहमीच आक्रमक आणि अभिनव आंदोलन करून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधून घेतात. ते कधी जलकुंभावर चढतात तर कधी मंत्रालायात दिव्यांगांच्या ट्रायसिकलने जातात. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी सर्व मंत्र्यांच्या घरासमोर रक्तदान शिबिर घेणार असल्याचे जाहीर केले.
आंदोलनातूनच बच्चू कडू आमदार झाले. अमरावती जिल्ह्यातील तिवसा विधानसभा मतदारसंघातून ते चार वेळा निवडून आले होते. महायुतीच्या पहिल्या कार्यकाळात राज्यमंत्री होती. मात्र यावेळी विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा धक्कादायक पराभव झाला. त्यानंतर त्यांनी पुन्हा आपले आंदोलनाचे अस्र उपसले आहे.
आज नागपूरमध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी मोठे जनआंदोलन उभारण्याची घोषणा केली. याकरिता ते सातारा ते नागपूर अशी रॅली काढणार आहेत. पुणे, ठाण्यांसह काही मोठ्या शहरांमध्ये सभा घेऊन नागपूरमध्ये आंदोलनाचा समारोप करणार आहेत.
महायुतीने विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. ममहायुती सरकार सत्तेवर येऊन पाच महिन्यांचा कार्यकाळ झाला आहे. मात्र एकही मंत्री आता सातबारा कोरा करणार असल्याचे सांगत नाही. त्यामुळे आमच्याकडे जनआंदोलनाशिवाय दुसरा पर्याय राहिला नसल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले.
नागपूरच्या समारोप सभेत शेतकरी, दिव्यांगासह सुमारे दीड लाख लोक उपस्थित राहतील असा दावाही कडू यांनी केला आहे. तत्पूर्वी १४ मे रोजी राज्यातील सर्व मंत्र्याच्या घरासमोर रक्तदान शिबिर घेऊन आंदोलनाकडे लक्ष वेधणार आहेत.
बच्चू कडू चार वेळा आमदार होते. अपक्ष निवडून येणारे कडू नेहमची सत्ताधाऱ्यांसोबत राहिले. महविकास आघाडीच्या सरकारमध्ये ते उद्धव ठाकरे गटासोबत होते. सुमारे अडीच वर्षे शिक्षण राज्यमंत्री होते. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ते सुद्धा गुवाहटीला गेले होते. सत्ता बदलल्यानंतर ते मंत्री होतील अशी आशा सर्वांनाच होती. एवढच नाहीतर विधानसभेच्या निवडणुकीत ते शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील असे बोलले जात होते. मात्र त्यांनी पुन्हा एकदा अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. तिसरी आघाडी तयार करून उमेदवार उभे केले होते. मात्र कडू यांच्यासह त्यांच्या आघाडीचे सर्वच उमेदवार पराभूत झाले.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.