Youth Swabhiman Party crisis : विदर्भात राजकीय भूकंप! बच्चू कडूंनी रवी राणांचा शिलेदार फोडला, संघर्ष चिघळणार

Nilesh Bhende, considered close aide Ravi Rana, joins Eknath Shinde Shiv Sena presence of Bachchu Kadu, creating major political buzz Vidarbha : एकनाथ शिंदे शिवसेचे आमदार बच्चू कडू यांनी आमदार रवी राणा यांचे खंदे समर्थक नीलेश भेंडे यांना फोडत, पक्ष प्रवेश दिल्याने राजकीय उलथापालथीचे संकेत मिळत आहेत.
bachchu kadu ravi rana
bachchu kadu ravi ranaSarkarnama
Published on
Updated on

Vidarbha political news : विदर्भातील राजकारणात मोठी उलथापालथ घडवणारी घडामोड समोर आली आहे. आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत युवा स्वाभिमान पक्षाचे कट्टर समर्थक मानले जाणारे नीलेश भेंडे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.

या राजकीय घडामोडीमुळे आमदार रवी राणा यांना मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

रवी राणा (Ravi Rana) यांच्या युवा स्वाभिमान पक्षातील आक्रमक आणि विश्वासू चेहरा म्हणून नीलेश भेंडे यांची ओळख होती. अनेक आंदोलने, संघटनात्मक काम आणि स्थानिक पातळीवरील मजबूत जनसंपर्कामुळे त्यांनी स्वतःचे स्वतंत्र राजकीय अस्तित्व निर्माण केले होते. मात्र आता त्यांनी थेट शिंदे शिवसेनेचा झेंडा हाती घेतल्याने विदर्भातील समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

विशेष म्हणजे हा पक्षप्रवेश आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्यामुळे हा केवळ साधा पक्षप्रवेश नसून रवी राणा यांच्याविरोधात बच्चू कडू यांनी टाकलेला मोठा राजकीय डाव मानला जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

bachchu kadu ravi rana
Andekar gang in Ahilyanagar : पुण्यातील आंदेकर टोळीची थेट अहिल्यानगरात एंट्री? उद्योजकावर कोयत्याने हल्ला अन् गोळीबाराचा संशय? 5 जण अटकेत, पिस्तुलांसह शस्त्रसाठा जप्त

नीलेश भेंडे यांच्या संपर्कात युवा स्वाभिमान पक्षातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते असल्याचीही चर्चा सुरू आहे. त्यामुळे आगामी काळात युवा स्वाभिमान पक्षाला आणखी गळती लागण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

bachchu kadu ravi rana
Ram Shinde : भाजपमध्ये ‘निष्ठावंत विरुद्ध शब्द दिलेले’ संघर्ष? राम शिंदेंच्या वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण

युवा स्वाभिमान पक्षात राहून नीलेश भेंडे यांनी अनेक आक्रमक आंदोलने करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. आता बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली ते नव्या जोमाने मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे बच्चू कडू यांची विदर्भातील राजकीय ताकद वाढणार असल्याचे मानले जात आहे.

रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील राजकीय संघर्ष विदर्भात कायम चर्चेचा विषय राहिला आहे. अशातच राणांचे जवळचे सहकारी मानले जाणारे नीलेश भेंडे यांना बच्चू कडू यांनी शिवसेनेत घेतल्याने हा संघर्ष आता आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आता या राजकीय धक्क्यानंतर रवी राणा पुढचा कोणता डाव टाकणार, याकडे संपूर्ण विदर्भाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com