Bacchu Kadu Vs Ravi Rana : बच्चू कडू मंत्रिपदासाठी सरकारला ब्लॅकमेल करतात; रवी राणांचा पलटवार

Amravati Politics : यशोमती ठाकूर यांनी २०१९ च्या निवडणुकीत आमदार रवी राणांकडून नोटा घेतल्या होत्या, असा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला होता.
Bacchu Kadu-Ravi Rana
Bacchu Kadu-Ravi Rana Sarkarnama
Published on
Updated on

Amravati News : हे मंत्रिपद पाहिजे, ते मंत्रिपद पाहिजे. सरकारला ब्लॅकमेल करून जो माणूस काहीतरी मिळवायचा प्रयत्न करतो. त्याला आवर घालण्याची गरज आहे, अशा शब्दांत आमदार रवी राणा यांनी माजी मंत्री बच्चू कडू यांच्यावर पलटवार केला. (Bachchu Kadu blackmails government for ministerial post: Ravi Rana's counterattack)

काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी २०१९ च्या निवडणुकीत आमदार रवी राणांकडून नोटा घेतल्या होत्या, असा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला होता. त्यावर बच्चू कडू यांनी देवेंद्र फडणवीस यांनी राणा दाम्प्त्याला आवर घालण्याची गरज आहे, असे वक्तव्य केले होते. त्यावर आमदार रवी राणा यांनी आज उत्तर दिले.

Bacchu Kadu-Ravi Rana
CM Ask Raut ? : ‘राऊत आले नाहीत का,?’ ; मुख्यमंत्र्यांचा भर पत्रकार परिषदेत सवाल

आमदार राणा म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मी गेली ११ ते १२ वर्षांपासून आहे. सरकार असतानाही आणि विरोधात असतानाही मी त्यांच्यासोबत कायम होतो. सुख-दुःखात आम्ही एकत्र राहणारे आहोत. पळ काढणाऱ्यातील आम्ही नाही. जो माणूस कधी इकडे कधी तिकडे राहतो, त्यांनी सल्ला द्यायचं काम आम्हाला करू नये.

बच्चू कडू यांची प्रत्येक निवडणूक मी पाहिली आहे. निवडणुकीत सर्व नेते एकत्र येऊन मला विरोध करतात, माझा पराभव घडविण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, अमरावतीमधील जनता माझ्यासोबत असते. बच्चू कडू यांना आवर घालण्याची गरज आहे. त्यांनी म्हटलं आहे की, मला एवढ्या आमदारकी आणि खासदारकीच्या जागा लढवायच्या आहेत. हे मंत्रिपद पाहिजे, ते मंत्रिपद पाहिजे. सरकारला ब्लॅकमेल करून जो माणूस काहीतरी मिळवायचा प्रयत्न करतो. त्याला आवर घालण्याची गरज आहे, असा टोमणाही रवी राणांनी कडू यांना लगावला.

Bacchu Kadu-Ravi Rana
Fadnavis On Sunil Kendrekar Report : सुनील केंद्रेकरांचा अहवाल हा अधिकृत समितीचा नव्हता; पण... ; फडणवीस अखेर बोलले

मला काहीही पाहिजे नाही. आम्ही कधी ना मंत्रिपद मागितलं ना तिकीट मागितलं. आम्हाला ना कुठल्या पदाची अपेक्षा आहे. राज्यात देवेंद्र फडणवीस हा एक सच्चा माणूस आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार आता त्यांच्यासोबत आहेत. या सर्व लोकांसोबत राहून अमरावती जिल्ह्याचा विकास करायचा, हा संकल्प घेऊन मी काम करत आहे. जे लोक सरकारला ब्लॅकमेल करतात, त्यांना आवर घालण्याची गरज आहे. देवेंद्र फडणवीसांनी रवी राणांना आवर घातला पाहिजे, असा सल्ला मला दिला आहे. मात्र, ज्या माणसाला आवर घालण्याची गरज आहे, त्यांनी आम्हाला सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नये, असा इशारा राणा यांनी दिला.

Bacchu Kadu-Ravi Rana
Sunil Shelke In Trouble : पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीने केली आमदार सुनील शेळकेंची अडचण

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com