.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Bacchu Kadu election 2025 : महाविकास आघाडीच्या कार्यकाळात शिक्षण राज्यमंत्री राहिलेले अचलपूरचे माजी आमदार बच्चू कडू यांचा पराभव प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांना चांगलाच जिव्हारी लागला आहे. बच्चू कडू यांना कुठल्याही परिस्थितीत विधानभवनात पाठवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. प्रहार शिक्षक संघटनेने त्यांना आता अमरावती विभागातील शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढण्याची गळ घातली आहे. बच्चूकडू यांनी ती तत्वतः मान्य केली असून याकरिता सर्वेक्षण करून शिक्षकांचे मत जाणून घेण्याचे ठरवले आहे.
अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीला अद्याप एक वर्षांचा कार्यकाळ शिल्लक आहे. हे बघता निवडणुकीच्या तयारीसाठी प्रहारच्या कार्यकर्त्यांना बराच वेळ मिळणार आहे. अमरावती जिल्ह्याचा आवाज पुन्हा विधानभवनात बुलंद करण्यासाठी संघटनेच्या सर्व शिक्षक सदस्यांनी बच्चू कडू यांनीच लढावे यासाठी आग्रह धरला असल्याचे संघटनेचे पदाधिकारी महेश ठाकरे यांनी सांगितले.
तसं बघितलं काँग्रेस आणि भाजप या बड्या पक्षापासून बच्चू कडू नेहमीच लांब राहिले आहेत. मात्र त्यांनी अचलपूर विधानसभा मतदारसंघातून चारवेळा अपक्ष निवडणूक जिंकून प्रस्थापितांना आपली ताकद दाखवली आहे. एक आक्रमक नेता म्हणून अल्पवधीतच त्यांनी आपली ओळख निर्माण केली. विधानसभेत सर्वांनाच आपली दखल घ्यायला लावली. दिव्यांगाची हेळसांड करणाऱ्या मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी त्यांनी यापूर्वी चोपही दिला आहे. त्यामुळे मंत्रालयातील अधिकारीसुद्धा त्यांना वचकून असायचे.
महाविकास आघाडीच्या कार्यकाळात ते उद्धव ठाकरे यांच्याजवळ गेले होते. त्यांना राज्यमंत्रीसुद्धा करण्यात आले होते. अडीच वर्षानंतर उद्धव ठाकरे यांचे सरकार पडले. एकनाथ शिंदे शिवसेनेचे चाळीस आमदार घेऊन बाहेर पडले. तेव्हा बच्चू कडू यांनीसुद्धा महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला नाही. त्यामुळे बच्चू कडू महायुती सरकारवर अधूनधून शब्द'प्रहार' करायचे.
विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी तिसरी आघाडी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मात्र तो त्यांच्या अंगलट आला. बच्चू कडू यांच्यासह प्रहारचे सर्वच उमेदवार पराभूत झाले. सर्वच पक्षाच्या नेत्यांसोबत पंगा घेणे त्यांना महागात पडले आहे.
शिवाय त्यांचा आणि अमरावती जिल्ह्याच्या माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यासोबत वाद चांगलाच गाजला होता. नवनीत राणा लोकसभेच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार असताना बच्चू कडू यांनी आपला उमेदवार उभा केला होता. या दोघांच्या भाडणात लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रसचा उमेदवार निवडून आला. त्यामुळे बच्चू कडू हे भाजपच्यासुद्धा टार्गेटवर होते.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.