Bahujan Samaj Party State President : बहुजन समाज पार्टीने दोनच दिवसांत निवडला नवा प्रदेशाध्यक्ष ; ॲड. सुनील डोंगरेंची नियुक्ती!

Bahujan Samaj Party and Maharashtra Elections : लोकसभेच्या निवडणुकीत झालेला दारूण पराभव अन् त्यानंतर पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेले वाद यामुळे बहूजन समाज पार्टीने संपूर्ण महाराष्ट्राची कार्यकारिणीच बरखास्त केली होती.
Sunil Dongare
Sunil DongareSarkarnama

Bahujan Samaj Party Politics in Maharashtra : दोन दिवसापूर्वी महाराष्ट्राची कार्यकारिण बरखास्त करणाऱ्या बहुजन समाज पार्टीने नवा अध्यक्ष नियुक्त केला आहे. सोबतच माजी अध्यक्षांना विविध राज्यात प्रभारी म्हणून पाठवण्यात आले आहे. नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून ॲड. सुनील डोंगरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सुनील डोंगरे वर्धा येथील आहेत. यापूर्वी ते सरचिटणीस होते. माजी प्रदेशाध्यक्ष ॲड.परमेश्वर गोणारे यांना कर्नाटक तर माजी उपाध्यक्ष ॲड.संदीप ताजने यांना प्रभारी म्हणून छत्तीसगडमध्ये पाठवण्यात आले आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत(Loksabha Election) झालेला दारूण पराभव त्यानंतर पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेली आपसातील भांडणामुळे बहूजन समाज पार्टीने संपूर्ण महाराष्ट्राची कार्यकारिणीच बरखास्त केली होती. पक्षाच्या स्थापनेपासून महाराष्ट्रात बसपाला लोकसभा आणि विधानसभेत अद्यापही खाते उघडता आले नाही. सोशल इंजिनिअरिंगचे अनेक प्रयोग यासाठी करण्यात आले होते. मात्र शेवटपर्यंत यश आले नाही.

Sunil Dongare
Lok Sabha Election 2024 : खासदाराच्या भाजप प्रवेशानंतर बसपामध्ये होणार विस्फोट? मायावती थेट तिकीटावरच बोलल्या...

विदर्भातून बसपाला मोठी अपेक्षा होती. नागपूर महापालिकेत दोन वेळा १० नगरसेवक निवडून आले होते. उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघात बसपाचा उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर पोहचला होता. नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघात बसपाचा(BSP) उमेदवार कोण राहणार याकडे भाजप आणि काँग्रेसचे लक्ष राहायचे. त्यावरून मतविभाजनाचे गणित मांडले जायचे. आता हासुद्धा धाक संपला आहे.

यावेळी बसपाच्या उमेदवारांची चर्चाच झाली नाही. नागपूर येथे झालेल्या बसपाच्या प्रमुख नेत्या मायावती यांच्या सभेला 15 हजारांचीसुद्धा गर्दी नव्हती. दिवसेंदिवस बसपाची लोकप्रियता घटत चालली असल्याचे यावरून स्पष्ट होते. यात पदाधिकाऱ्यांच्या आपसातील भांडणे, उघउघड केले जाणारे एकमेकांवर आरोपांमुळे यात अधिकच भर पडली आहे.

नागपूरमध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्राचे पदाधिकारी उपस्थित असताना दोन कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच धक्काबुक्की झाली होती. हा वाद पोलिस ठाण्यापर्यंत पोहचला होता. या वादाला सोशल मीडियावरून प्रसिद्धी देण्यात आल्याने दोन जणांना निष्कासित करण्यात आले होते. अखेर त्यांच्या बचावासाठी जिल्हा प्रमुखानेच पत्रकार परिषद घेतली.

Sunil Dongare
Mayawati Birthday: राष्ट्रीय स्तरावरील प्रभावशाली 'बहनजी', मायावती...

तेव्हापासून सुरू झालेल्या आरोपप्रत्यारोपांच्या फैरी संपतच नव्हत्या. मध्यंतरी बसपाचे प्रदेशाध्यक्षांनी हे प्रकार बंद करण्याचा सर्वांना इशारा दिला होता. लेखी पत्र काढून सर्वांना जाहीर तंबी देण्यात आली होती. या घडामोडी सुरू असताना संपूर्ण राज्याची कार्यकारिणीच बरखास्त करण्यात आल्याने प्रदेशाध्यक्ष व त्यांच्या पाठिराख्यांना मोठा धक्का बसला होता.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com