Bawankule vs Thackeray : ...म्हणूनच, आई-वडिलांची अन् पोहरादेवीची शपथ घ्यावी लागते !

Uddhav Thackeray : ते राजकारणातील खालच्या स्तरावर उतरले आहेत.
Chandrashekhar Bawankule and Uddhav Thackeray
Chandrashekhar Bawankule and Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray : भाजपशी बेईमानी केल्यावर त्यांच्या नेत्यांवर उद्धव ठाकरे टीका करीत आहेत, ते राजकारणातील खालच्या स्तरावर उतरले आहेत. म्हणूनच ते आई-वडिलांची आणि पोहरादेवीची शपथ घेत आहेत, अशी घणाघाती टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. (He has descended to the lowest level of politics)

ते नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधत होते. उद्धव ठाकरे यांची स्मृती गेली आहे, असे सांगून श्री बावनकुळे यांनी सभेतून उद्धव ठाकरे यांनी भाजप व नेत्यावर केलेल्या आरोपांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, २०१९ मध्ये मतपेटीनेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे असा कौल दिला होता.

जनतेने मतपेटीतून निवडून दिलेल्या सरकारला सत्तेवर न येऊ देता तुम्ही शरद पवार यांच्यासोबत कट करून सत्तेवर आले. त्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना भावासारखे सांभाळले. त्यांना मुख्यमंत्री होऊ न देण्यासाठी शरद पवारांच्या कटाला साथ द्यायची होती तिथे त्यांनी साथ दिली.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी विदर्भ वैधानिक विकास मंडळाला स्थगिती दिली, नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन घेतले नाही, डीपीसीचे पैसे कमी केले, सिंचन आणि रस्त्यांचा बॅकलॉग वाढला. सत्ता असताना विदर्भाच्या विकासाकडे लक्ष दिले नाही.

Chandrashekhar Bawankule and Uddhav Thackeray
Bawankule on Bacchu Kadu : आम्हाला शेवटी तरी जेवण मिळणार का? बच्चू कडूंच्या प्रश्‍नावर बावनकुळे म्हणाले…

विदर्भाची जनता त्यांच्यावर नाराज आहे. मुख्यमंत्री झाल्यावर केवळ दोन दिवस मंत्रालयात येत असेल तर हा महाराष्ट्राचा आणि विदर्भाचा अपमान आहे. त्यांच्याकडे नेते नाही आणि माणसेही नाहीत त्यामुळे मीडियाच्या माध्यमातून ते भाजपवर टीका करीत आहेत.

पृथ्वीराज चव्हाणांनी स्पष्ट करावे..

२०२४ पर्यंत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हेच मुख्यमंत्री राहणार आहेत. आम्ही कुठेही भूकंप घडवणार नाही. काँग्रेस (Congress) पक्षातून कोणी भाजपमध्ये येणार असेल तर त्यांच्यासाठी भाजपचे दुपट्टे तयार आहे. मात्र काँग्रेसने आपला पक्ष सांभाळून ठेवावा. कॉंग्रेसमध्ये भूकंप होणार आहे का, हे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वत: स्पष्ट करावे, असाही टोला चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी लगावला.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com