Latur Crime : न्यायालयाचा शिंदेंच्या मराठवाड्यातील शिवसेना नेत्याला मोठा झटका; अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येप्रकरणी 10 वर्षांचा कारावास

Shiv Sena leader sentenced : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये उपजिल्हाप्रमुख या पदावर काम करणाऱ्या कार्यकर्त्याला अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी अखेर तीन वर्षानंतर शिक्षा झाली आहे.
Vikas Jadhav
Vikas JadhavSarkarnama
Published on
Updated on

Latur News, 05 Jan : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये (Shivsena) उपजिल्हाप्रमुख या पदावर काम करणाऱ्या कार्यकर्त्याला अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी अखेर न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.

उपजिल्हाप्रमुखावर विकास जाधव (Vikas Jadhav) याने 2020 साली एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता. ज्यामुळे पीडित मुलीने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला होता. या अत्याचारप्रकरणी शिंदेंच्या शिवसेनेचे (Shivsena) उपजिल्हाप्रमुख विकास जाधव याच्यावर तीन वर्षांपूर्वी गुन्हा नोंद करण्यात आला होता.

Vikas Jadhav
Dhananjay Munde : मंत्री मुंडेंनी पत्नी करुणा यांच्याविषयी काय माहिती लपवली; खंडपीठात याचिका दाखल

अखेर आरोप सिद्ध झाल्यानंतर सोमवारी आरोपी विकास जाधव याला उदगीर येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने 10 वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर पीडित मुलीच्या कुटुंबियांनी समाधान व्यक्त केलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

लातूर (Latur) जिल्ह्यातील उदगीर येथील रहिवासी आणि शिंदेंच्या शिवसेनेचा उपजिल्हाप्रमुख असलेल्या विकास जाधव याने 2020 साली एका अल्पवयीन मुलीशी संबंध ठेवले होते. या प्रकरणी घरच्यांनी समजून सांगितल्यानंतरही त्याने आपल्या राजकीय पदाचा गैरवापर करत पीडित मुलीला आणि तिच्या कुटुंबीयांना सतत धमकावलं.

Vikas Jadhav
BJP Politics : भाजपच्या बड्या नेत्यावर भीक मागण्याची वेळ, ‘बुलेट दा’चे फोटो व्हायरल होताच उडाली खळबळ

शिवाय त्याने एक वर्षभर त्या मुलीशी संबंध ठेवले. त्यानंतर बदनामी आणि बेइज्जत होऊ नये म्हणून मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांमध्ये तक्रार केली नाही. मात्र याचाच गैरफायदा विकास जाधवने घेतला. अखेर त्याच्या अत्याचाराला कंटाळून पीडित मुलीने आत्महत्या केली. आत्महत्येनंतर वाढवणा पोलिस स्टेशनमध्ये 3 सप्टेंबर 2020 रोजी पोस्को अंतग्रत गुन्हा नोंदवण्यात आला होता.

त्यानंतर आरोपी विकास याला पोलिसांनी अटक केली. मात्र काही दिवसांततो जामिनावर बाहेर आला. त्यानंतर पीडित मयत मुलीच्या वडिलांनी हे प्रकरण कोर्टात नेलं होतं. त्यानंतर 2022 साली आरोप निश्चित करून सुनावणीला सुरुवात झाली. याच प्रकरणी सोमवारी उदगीर येथील विशेष अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने विकास जाधव याला दोषी ठरवत त्याला दहा वर्षे शिक्षा आणि पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com