Bhaskar Jadhav : हिंगणा मतदारसंघ का वाटतोय ठाकरे सेनेला हवाहवासा ?

Hingana Assembly Constituency of Nagpur : महाविकास आघाडीत काटोल मतदारसंघ शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोडावा लागणार असल्याने त्या बदल्यात हिंगणा मागण्याची तयारी केली जात आहे. तसे संकेतसुद्धा उद्धव ठाकरेंच्या सेनेचे संपर्क प्रमुख भास्कर जाधव यांनी दिले आहे.
Shivsena - Uddhav Balasaheb Thackeray
Shivsena - Uddhav Balasaheb ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : नागपूर जिल्ह्यातील हिंगणा विधानसभा मतदारसंघाला उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेची सर्वाधिक पसंती आहे. महाविकास आघाडीत काटोल मतदारसंघ शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोडावा लागणार असल्याने त्या बदल्यात हिंगणा मागण्याची तयारी केली जात आहे. तसे संकेतसुद्धा उद्धव ठाकरेंच्या सेनेचे संपर्क प्रमुख भास्कर जाधव यांनी दिले आहे.

भाजपसोबत युती असताना हिंगणा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. परंतु तो सेनेला कधीच जिंकता आला नाही. स्थानिक नेत्यांना भांडणामुळे कटांळून शिवसेनेने तो भाजपसाठी सोडला होता. विजय घोडमारे यांनी हिंगणा सर्वप्रथम भाजपला जिंकून दिला होता. नंतरच्या निवडणुकीत घोडमारे यांच्याऐवजी समीर मेघे यांना भाजपने हिंगण्यात पाठवले. ते सलग दोनवेळा येथून जिंकून आले आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मात्र महायुतीचा उमेदवाराला सर्वाधिक फटका हिंगणा मतदारसंघाने दिला.

येथून तब्बल साडे अठरा हजारांचे मताधिक्य महाविकास आघाडीला मिळाले. यातही वाडी नगर परिषदेतून साडेसहा हजारांचे मताधिक्य मिळाले आहे. वाडीमध्ये युवा सेनेचे विदर्भातील एकमेव कार्यकारिणी सदस्य हर्षल काकडे नगरसेवक आहेत. ते बांधकाम सभापती सुद्धा होते. युवा सेनेचे नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. 

माजी खासदार कृपाल तुमाने सोडून गेल्यानंतर येथील एकही शिवसैनिक शिंदे सेनेत दाखल झाला नाही. विशेष म्हणजे वाडीच्या मतदारांनी नेहमीच शिवसेनेला झुकते माप दिले आहे. आजवर एकाही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याला वाडी येथून मताधिक्य घेता आले नाही. हा इतिहास आहे. नागपूर जिल्ह्यात शिवसेनेला आजवर रामटेक विधानसभा मतदारसंघाचा अपवाद वगळता एकही मतदारसंघ जिंकता आला नाही. 

हे बघता रामटेक उद्धव सेनेलाच मिळणार हे जवळपास निश्चित झाले आहे. उद्धव सेनेकडे दुसरा मतदारसंघ काटोल आहे. येथून शिवसेनेने अनेकदा मुसंडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र अनिल देशमुख यांच्यामुळे तो शिवसेनेला जिंकता आला नाही. सतीश शिंदे, किरण पांडव, राजू हरणे येथून सेनेकडून लढले होते. आता महाविकास आघाडीत शरद पवार सोबत आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख आमदार आहेत. हे बघता उद्धव सेनेला या जागेवर पाणी सोडावे लागणार आहे. त्यामुळे पर्याय म्हणून हिंगणा मतदारसंघ मागायचा असे जवळपास ठरले असल्याचे समजते.

Shivsena - Uddhav Balasaheb Thackeray
Uttar Pradesh Lok Sabha Election : …तर 'यूपी'तील दोन लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक! ही आहेत कारणं

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com