Nagpur News, 03 Jan : महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे दिवस उमेदवारांना मिळणार आहे. नागपूरमध्ये सुमारे चाळीस हजार लोकसंख्येचा एक प्रभाग असल्याने २४ तासांचा दिवसही प्रचारासाठी कमी पडणार आहे. प्रत्येकाच्या घरी जायचे त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आणि आपला जाहीरनामा घरोघरी पोचवण्याची कसरत प्रत्येकाला करावी लागणार आहे.
मात्र भाजपने आपल्या उमेदवाराची प्रचाराची चिंता दूर केली आहे. याकरिता भाजपच्या ४२ विविध आघाड्यांना प्रचारात सहभागी करून घेतले जाणार आहे. नागपूर महापालिकेत १५१ जागेसाठी सुमारे दोन हजार इच्छुक कार्यकर्त्यांनी तिकीट मागितले होते. कोणाला तिकीट द्यायचे आणि कोणाचे कापायचे याचे मोठे टेंशन भाजपच्या नेत्यांसमोर होते. कोणालाही तिकीट दिले तरी नाराजी निर्माण होणारच होती.
मात्र केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी ही परिस्थिती हताळली. त्यांच्याच कार्यालयातून एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले. त्यानंतर तिकीट कापलेल्या काही नाराजांनी बंडाचे निशान फडकावले आहे. अर्ज मागे घेऊ नये याकरिता भाजपच्या एका उमेदवाराला कार्यकर्त्यांनीच खोलीत डांबून ठेवले होते. नागपूरमध्ये भाजपला बऱ्यापैकी बंडखोरी क्षमवण्यात यश आले आहे. कोणी मोठा बंडखोर सध्यातरी रिंगणात नाही.
मात्र, आता ज्यांना उमेदवारी देण्यात आली त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी नेत्यांवर आली आहे. त्यातील सर्वात मोठी अडचण घरोघरी पोहचण्याची आहे. याकरिता भाजपचे शहराध्यक्ष दयाशंतकर तिवारी यांनी तातडीने सर्व आघाड्यांचा प्रमुखांना बोलावून १० दिवसात कसा जनसंपर्क करायचा ययाचा रोडमॅप त्यांच्या हातात दिला. सर्व आघाड्यांना आक्रमकपणे मैदानात उतरून जनसंपर्क करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
शहराच्या विकासासाठी जनतेकडून थेट सूचना संकलित करण्यासही सांगण्यात आले आहे. भाजपच्या ठरलेल्या नियोजनानुसार प्रामुख्याने व्यापारी आघाडीने व्यावसायिकांशी, सी.ए आघाडीने त्यांच्या ग्राहकांसोबत, फार्मासिस्ट आघाडीने त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांपर्यंत पोहोचावे आणि दिव्यांग आघाडीने दिव्यांग लोकांसाठी पक्षाने केलेल्या कार्याची माहिती जनतेला द्यावी,अशा सूचना देण्यात आल्या.
शनिवार आणि रविवार या सुटीच्या दिवशी युवा मोर्चा, महिला मोर्चा,अल्पसंख्याक मोर्चा आणि अनुसूचित जनजाती आघाडी हे सर्व आघाड्या सक्रिय राहून जनतेच्या सूचना एकत्रित करणार आहेत. चार दिवसांत संपूर्ण शहरातून जवळपास ४० हजार सूचना गोळा करण्याचे नियोजन असून, आलेल्या सर्व महत्त्वपूर्ण सूचनांचा समावेश येत्या १० तारखेला घोषित होणाऱ्या जाहीरनाम्यात करण्यात येणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.