BJP Congress alliance : मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात 'या' निवडणुकीसाठी भाजप-काँग्रेसची युती अन् दादांची राष्ट्रवादी मात्र एकाकी!

BJP and Congress form an alliance while NCP stands alone : जाणून घ्या, नेमकी कोणत्या निवडणुकीसाठी या दोन प्रमुख विरोधी पक्षांनी हातमिळवणी केली आहे?
BJP, Congress
BJP, CongressSarkarnama
Published on
Updated on

BJP-Congress Alliance Shakes Up Local Election Dynamics : नागपूर ग्रामीणमध्ये काँग्रेसचे नेते सुनील केदार आणि भाजप नेत्यांमध्ये कट्टर वैर आहे. विधानसभेच्या निवडणुकीत केदारांना पराभूत करण्यासाठी सर्वच भाजप नेत्यांनी जोरदर प्रयत्न केले होते. त्यात भाजप यशस्वीसुद्धा झाली आहे.

केदारांचे ग्रामीण भागातील राजकीय वर्चस्व संपण्याचा प्रयत्न सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसने युती केली आहे. त्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. स्थानिक राजकारणातील या घडामोडींमुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांना एकटे पाडण्यात आले आहे.

मौदा खरेदी विक्री संघाची निवडणुकीसाठी आज रविवारी (ता.१) मतदान होणार आहे. भाजप आणि काँग्रेसच्या युतीमुळे ही निवडणूक चुरशीची झाली असून निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुनील केदार नेहमीच भाजपच्या नेत्यांना उघडपणे आव्हान देत असतात. लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला एकहाती विजय मिळवून दिला होता. भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. काँग्रेसच्या आमदाराला यासाठी महायुतीत आयात करण्यात आले होते. यानंतरही भाजपला यश मिळाले नाही.

BJP, Congress
Congress protest : विदर्भातील ज्या गावात मोदींनी शेतकऱ्यांना दिली होती आश्वासनं, तिथूनच काँग्रेस छेडणार आंदोलन!

लोकसभेनंतर केदारांनी आमदार समीर मेघे यांना पाडण्याची घोषणा केली होती. दुसरीकडे दहा वर्षांपासून केदारांना घेरण्याचे सर्वच प्रयत्न अपयशी ठरले होते. अमित शहा यांना प्रचारासाठी खास बोलावण्यात आले होते. मात्र केदार सर्वांना पुरून उरले होते. नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या घोटाळ्यात न्यायालयाने शिक्षा सुनावल्याने केदारांना यावेळी विधानसभेची निवडणूक लढता आली नाही. त्यांच्या पत्नीला पराभूत करण्यात भाजपला यश आले आहे.

आता जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होणार आहे. त्याकरिता केदारांनी पुन्हा आपली सत्ता कायम राहावी यासाठी आतापासूनच फिल्डिंग लावली आहे. त्यांनी आपली टीमही तयार केली असून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पराभवाचा वचपा काढण्याच्या तयारीत ते आहे.

BJP, Congress
Kanchan Gadkari Giant onion farming : अबब! एक कांदा चक्क एक किलोचा अन् एकारात १३ टण उत्पादन; कांचन गडकरींचा अनोखा प्रयोग

नागपूर जिल्ह्यात भाजप आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू असताना खरेदी विक्री संघात केदार आणि भाजपच एकत्र आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवराजबाबा गुजर यांच्या पॅनेलच्या विरोधात सुनील केदार आणि आणि भाजपचे माजी आमदार टेकचंद सावरकर यांनी आपसात युती केली आहे. दोघेही एकत्र प्रचार करीत आहेत. भाजप-काँग्रेस युतीचा आगामी जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com