Nagpur Poliitics: आमदार'कीसाठी इच्छुक देशमुख भावंडांमध्ये रेल्वेच्या थांब्यावरून श्रेयवादाची लढाई

Ashish Deshmukh Vs Saleel Deshmukh News : काटोल विधानसभा मतदारसंघातून आशिष देशमुख यांनी भाजप तर सलील देशमुख यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे उमेदवारी देण्याची मागणी केली आहे.
Ashish Deshmukh, Anil Deshmukh, Salil Deshmukh
Ashish Deshmukh, Anil Deshmukh, Salil DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी उत्सुक असलेले माजी आमदार आशिष देशमुख आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचे पुत्र, जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख या दोन चुलत भावांमध्ये रेल्वेने पूर्ववत सुरू केलेल्या रेल्वे थांब्याच्या श्रेयावरून जुंपली आहे. दोघांनीही आपआपल्या नेत्यांना याचे श्रेय देऊन आपल्या पक्षाचे आभार मानले आहे.

मागील दोन वर्षांपासून रेल्वे थांबे पूर्ववत सुरू करावे अशी मागणी केली जात होते. रामटेकचे खासदार असताना कृपाल तुमाने यांनी संसदेत हा प्रश्न विचारला होता. त्यानंतर विद्यमान खासदार श्यामकुमार बर्वे यांनीही याकडे संसदेत लक्ष वेधले होते. आज हे थांबे पुन्हा सुरू करण्यास रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.

काटोल आणि नरखेड परिसरातून रेल्वेच्या माध्यमातून लाखो लोकं प्रवास करतात. या तीन गाड्यांचे बंद असलेले थांबे पूर्ववत सुरू केल्यामुळे या भागातील प्रवाश्यांना नक्कीच फायदा होणार आहे. या भागातील प्रवाशांची गरज लक्षात घेत रेल्वे मंत्रालयाने थांबे पूर्ववत सुरू केल्याबद्दल रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचे आभार भाजपचे ओबीसी मोर्चाचे प्रदेश प्रदेश प्रभारी आशिष देशमुख यांनी मानले आहे.

दुसरीकडे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, जि.प. सदस्य सलील देशमुख यांनी आपण स्वतः दिल्लीला जाऊन रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली होती, खासदार बर्वे यांना निवेदन दिले होते, असे सांगून त्यांनी आपल्या पत्राची दखल घेतल्याचे म्हटले आहे. याकरिता त्यांनी खासदर बर्वे यांना धन्यवाद दिले.

Ashish Deshmukh, Anil Deshmukh, Salil Deshmukh
Ahmednagar Politics : काळे-कोल्हेंमधला संघर्ष तीव्र; आमदार काळे म्हणाले, 'कोल्हेंना विकास न दिसणारी कावीळ..

आमदार अनिल देशमुख यांनीसुद्धा तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेवून निवेदन दिले होते. काटोल येथे आंदोलन केले होते. श्यामकुमार बर्वे यांनी लोकसभेत यासाठी आवाज उठवला होता. सातत्यपूर्ण पाठपुरावा ठेवल्याने नरखेड व काटोलला दोन रेल्वे गाडयांचे थांबे पुन्हा सुरू झाले असल्याचे सलील देशमुख यांनी सांगितले.

काटोल विधानसभा मतदारसंघातून आशिष देशमुख यांनी भाजप तर सलील देशमुख यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे उमेदवारी देण्याची मागणी केली आहे.

Ashish Deshmukh, Anil Deshmukh, Salil Deshmukh
Bharane Vs Patil : दत्तात्रेय भरणेंनी हर्षवर्धन पाटलांना डिवचले; 'मला पूर्वीही अन्‌ आताही चांगली झोप लागते'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com