Bharane Vs Patil : दत्तात्रेय भरणेंनी हर्षवर्धन पाटलांना डिवचले; 'मला पूर्वीही अन्‌ आताही चांगली झोप लागते'

Indapur Politics : पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या घोषणेनंतर आमदार दत्तात्रेय भरणे यांनी पत्रकारांशी बोलताना त्यांच्या जुन्या विधानावरून खिल्ली उडवली आहे. तसेच, त्या विधानात गर्भित इशाराही असल्याचे मानले जात आहे.
Harshvardhan Patil-Dattatray Bharane
Harshvardhan Patil-Dattatray BharaneSarkarnama
Published on
Updated on

Indapur, 04 October : माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याची घोषणा करताच माजी राज्यमंत्री तथा आमदार दत्तात्रेय भरणे यांनी त्यांना त्यांच्याच जुन्या विधानावरून डिवचले आहे. तसेच त्या विधानात गर्भित इशाराही असल्याचे मानले जात आहे, त्यामुळे इंदापुरात आगामी काळात भरणे आणि पाटील यांच्यात जोरदार वाक्‌युद्ध रंगण्याची चिन्हे आहेत.

राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी आज भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा देत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. त्याच वेळी त्यांनी फडणवीस यांनी दिलेला प्रस्ताव मान्य न करता विधानसभा निवडणूक लढविण्यास प्राधान्य दिल्याचे मानले जात आहे.

पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या घोषणेनंतर आमदार दत्तात्रेय भरणे यांनी पत्रकारांशी बोलताना त्यांच्या जुन्या विधानावरून खिल्ली उडवली आहे. मला पूर्वीही चांगली झोप लागत होती. सध्याही चांगली झोप लागत आहे आणि भविष्यातही लागेल, असा टोला भरणे यांनी पाटील यांना लगावला आहे.

Harshvardhan Patil-Dattatray Bharane
Rajan Patil : माझ्यासह माझ्या परिवाराला लोक गुणदोषांसह स्वीकारतात; राजन पाटलांचे टीकाकरांना उत्तर

हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर लोणावळा येथील एका कार्यक्रमात बोलताना आता आपल्याला शांत झोप लागते, असे विधान कले होते. त्यांच्या त्या विधानाची राज्यात चांगलीच चर्चा झाली होती. विशेष म्हणजे त्या वेळी राज्यात ईडी आणि सीबीआय कारवाईंना जोर होता, त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील नेत्यांची झोप उडाली होती. तो संदर्भ पाटील यांच्या बोलण्याला होता. त्यावरून भरणे यांनी आज पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

जनतेसाठी काम करणाऱ्यांमध्ये आत्मविश्वास असतो. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केलेल्या प्रवेशावर माझ्या मनात घालमेल व्हायचा अजिबात विषय नाही, असेही भरणे यांनी स्पष्ट केले.

Harshvardhan Patil-Dattatray Bharane
Indapur Politic's : पवारांचा 2029 साठी 'मास्टर स्ट्रोक'; हर्षवर्धन पाटलांचाही विधानसभेचा मार्ग मोकळा...!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माझी उमेदवारी अजून फायनल झालेली नाही. पक्षनेतृत्वाकडून मला अजूनही अधिकृतपणे सांगण्यात आलेले नाही. त्यामुळे मला अजून तरी फायटिंग वाटत नाही. पक्षाने उमेदवारी दिल्याचे मला अजूनही माहिती नाही. पण मी निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवसापासून जनतेत फिरतो. प्रत्येकाच्या सुख-दुःखात सामील होतो. जेवढी मदत करता येईल, तेवढी मदत माझ्याकडून करण्याचा प्रयत्न करतो, असेही भरणे यांनी सांगितले.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com