काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी मतचोरीचा विषय चांगलाच गाजवला आहे. इंडिया आघाडीतील नेत्यांनाही ते आता पटले आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नाशिकच्या शिबिरात ईव्हीएमच्या विरोध करण्याचा ठराव घेण्यात आला.
हे बघता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ईव्हीएमवरून मोठा असंतोष निर्माण होण्याची चिन्हे आहेत. यावर भाजपचे नेते आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, प्रत्येक पक्षाला पराभवाचे खापर कोणावर तरी फोडावे लागते. आपले कार्यकर्ते पक्ष सोडून जाऊ नये याकरिता पक्षाच्या बैठकांमध्ये त्यांची समजूत काढण्यासाठी काहीतरी विषय पुढे करून बोलावे लागते असे सांगून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठरावाची त्यांनी खिल्ली उडवली.
इंडिया आघाडीचा पराभव झाल्यापासून त्यांचे नेते ईव्हीएम ठपका ठेवत आहे. रोज आरोप केले जात आहे. निवडणूक आयोगावर टीकाटीपणी केली जात आहे. मतचोरी आणि ईव्हाएम हॅक केल्याचे दावे केले जात आहे. निवडणूक आयोगाने यापूर्वी सर्वांना अधिकृत बोलावले होते. आरोप सिद्ध करण्यास सांगितले होते. आक्षेप नोंदवण्याचे आवाहन केले होते. मात्र त्यावेळी कोणीही समोर आले नाही. आयोगाने दिलेले आव्हान स्वीकारले नाही. बाहेर मात्र आयोगावर मतोचरीचे आरोप करणे सुरूच आहे. यात काही नवीन नाही.
राजकारणात आरोप करावेच लागचच लागलात. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची परिस्थिती खराब आहे. कार्यकर्ते त्यांना सोडून चालले आहेत. त्यांना थोपवण्यासाठी, समजूत काढण्यासाठी पक्षाच्या बैठकीत घोषणा आणि ठराव करावे लागतात असा टोलाही बावनकुळे यांनी लगावला. संजय राऊत रोजच भाजपवर आरोप करतात. टीका करीत असतात. त्यांना दुसरे काम नाही. त्यामुळे त्यांचे वक्तव्य कोणी सिरिअस घेत नाही.घेण्याचे कारणही नाही.
माध्यमांसमोर येण्यासाठी त्यांनी काही विषय लागतात. नवीन नागपूर वसण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. त्यासाठी काही जागा अधिग्रहित करणे आवश्यक आहे. भूसंपादन मंत्री या नात्याने शेतकऱ्यांचा कुठल्याही परिस्थितीत नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाईल. प्रत्येक शेतकऱ्यांना त्यांचा जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणे मिळेल. प्रत्यक्षात भूसंपादनची प्रक्रिया सुरू होईल तेव्हा शेतकऱ्यांची जमिनीचे दर आणि मोबदल्याबाबत चर्चा केली जाईल असेही आश्वासन चंद्रशेखर बाबवकुळे यांनी दिले.