Chandrashekhar Bawankule : एका निवडणुकीने आम्हाला फरक पडणार नाही! बावनकुळे असं का म्हणाले?

Chandrashekhar Bawankule On Lok Sabha Result : ज्यांच्या नेतृत्वात भाजपचा लोकसभा निवडणुकांमध्ये दारुण पराभव झाला ते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अजूनही भानावर येत नसल्याचं त्यांच्या बोलण्यावरुन दिसून येत आहे.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama

Nagpur News, 6 June : महाराष्ट्रात भाजपचं 45 जागांचं जिंकण्याचं मिशन होतं मात्र, फोडाफोडीच्या राजकारणात अडकलेल्या भाजपला जबर धक्का बसला. मागील खेपेला 23 खासदार असलेल्या या पक्षाला जेमतेम 9 जागा मिळाल्या. भाजपचा हा मोठा पराभव असल्याची जाणीव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना झाली आणि ते जबाबदारी स्वीकारुन राजीनाम्याच्या तयारीपर्यंत आले.

मात्र, ज्यांच्या नेतृत्वात निवडणुकांमध्ये दारुण पराभव झाला ते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अजूनही भानावर येत नसल्याचं त्यांच्या बोलण्यावरुन दिसून येत आहे. एक निवडणूक हरल्याने आम्हाला काही फरक पडणार नाही, असे सांगून बावनकुळेंनी आपला तोरा दाखवून दिला.

भारतीय जनता पक्षाला (BJP) यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एक आकडी जागांवर समाधान मानावं लागलं आहे. अर्थात ही बाब भाजपच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. याचा अंदाज कालच्या देवेंद्र फडणवीसांच्या 'मला सरकारमधून मोकळं करा' या वक्तव्यावरुन आला आहे. मात्र, आता या पराभवानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरात बोलताना, "एक निवडणूक हरल्याने फरक पडत नसतो. आम्ही पुन्हा काम करू आणि राज्यात महातुयीची सत्ता स्थापन करू" असं वक्तव्य केलं आहे.

जातीपातीच्या राजकारणाने भाजपचा घात केला. संविधान बदलणार असल्याची खोटी भीती जनतेला दाखवण्यात आली. आता लोक जातपात सोडतील आणि राज्यात आम्ही पुन्हा सरकार स्थापन करू असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी बोलताना ते म्हणाले, "मोदींचा पराभव करण्यासाठी सर्व पक्ष एकत्र आले होते. इंडिया आघाडीची स्थापना केली होती.

संविधान बदलणार अशा थापा मारल्या. जनतेला भ्रमित केलं. अपप्रचारावर त्यांचा भर होता. महाराष्ट्रात विरोधकांची जातीयवादी राजनीती जिंकली आहे. इंडिया आघाडीने खोटं बोलून मत घेतली. एकदा जनता भ्रमित झाली. ती वारंवार होत नसते. याची प्रचीती आगामी विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला येईल."

Chandrashekhar Bawankule
Bharat Gogawale:उदय सामंतांच्या बालेकिल्ल्यावर राणेंचा डोळा; गोगावले संतापले

आता विरोधकांनी ईव्हीएमचा मुद्दा बाजूला ठेवला आहे. भाजप जिंकल्यावर ईव्हीएममुळे जिंकतो असे विरोधक दावे करीत होते, मात्र, आता तेच जिंकलेत, त्यामुळे ईव्हीएमचा मुद्दा त्यांनी बाजूला ठेवला असल्याचा टोला बानवकुळेंनी विरोधकांना लगावला.

इंडिया आघाडीने इतक्या खटपट करूनही त्यांना मोदी यांचा पराभव करता आला नाही. मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए जिंकली आहे. मोदी हेच देशाचे नेते आहेत आणि पंतप्रधान होणार आहेत. मतदानाच्या टक्केवारीतसुद्धा आम्ही पुढे आहोत. काही जागा आम्ही कमी मतांनी हरलो. मागील वेळीच्या तुलनेत यावेळी मताधिक्य वाढले असल्याचा दावादेखील त्यांनी केला.

देवेंद्र फडणवीस यांनी प्रचंड काम केलं

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रचंड काम केले. राज्याचा विकास केला. सर्व गोरगरीब जनतेला लाभ मिळवून दिला. मात्र जातीपातीच्या राजकारणामुळे ते दुखावले गेले. फडणवीसांनी राजीनामा देऊ नये यासाठी आम्ही सर्वांनी विनंती केली आहे. त्यांना छळण्यात येते त्यामुळे वाईट वाटते. महाविकास आघाडीचा विजय कट कारस्थान, शकुनी नीतीचा असल्याचं त्यांनी म्हटलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com