Sandeep Kshirsagar : बीडमध्ये आणखी एक ट्विस्ट; संतोष देशमुख खूनप्रकरणी आक्रमक भूमिका घेणाऱ्या संदीप क्षीरसागरांनी घेतली अजितदादांची भेट (Video)

Santosh Deshmukh Murder Case : सुरेश धस यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांच्यापासून विरोधकांकडून टीकेची झोड उठवलेली असतानाच आता संदीप क्षीरसागर आणि अजित पवार यांची भेट झाल्याचे पुढे आले आहे.
Sandeep Kshirsagar-Ajit Pawar
Sandeep Kshirsagar-Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune, 16 February : बीडच्या राजकारणात पुन्हा एकदा ट्विस्ट आला आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात जोरदार वाकयुद्ध रंगले आहे. विशेषतः मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील यांनी सुरेश धस यांच्या विरोधात कठोर भूमिका घेतलेली असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी जुन्नमध्ये जाऊन भेट घेतली आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

संतोष देशमुख खूनप्रकरणी आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. विशेषतः धनंजय मुंडे यांच्यावर ते तुटून पडले आहेत. देशमुख खूनप्रकरणाचा तपास लागेपर्यंत नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी संदीप क्षीरसागर यांनी अनेकदा केलेली आहे. तसेच सुरेश धस यांच्या मुंडे यांच्यासोबतच्या भेटीवर त्यांनी टीका केली हेाती.

दरम्यान, धनंजय मुंडे यांच्यावर टीका करणारे आणि संतोष देशमुख खूनप्रकरणी कठोर भूमिका घेणारे आमदार संदीप क्षीरसागर यांनी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात येऊन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान पवार आणि क्षीरसागर यांच्यात काय चर्चा झाली, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, दोघांमध्ये बराच वेळ गुफ्तगू सुरू होते.

Sandeep Kshirsagar-Ajit Pawar
Bhaskar Jadhav Upset : भास्कर जाधवांच्या नाराजीचे कारण सांगताना शंभूराज देसाईंनी ठाकरेंच्या वर्मावरच घाव घातला!

सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याने बीडचे राजकारण पुन्हा पेटले आहे. सुरेश धस यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांच्यापासून विरोधकांकडून टीकेची झोड उठवलेली असतानाच आता संदीप क्षीरसागर आणि अजित पवार यांची भेट झाल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे संदीप क्षीरसागर हे या भेटीवर काय स्पष्टीकरण देतात, हे पाहावे लागणार आहे.

Sandeep Kshirsagar-Ajit Pawar
Ajit Pawar : अजितदादांनी बोलून दाखवली मनातील गोष्ट; ‘पहिलं मी रेटून बोलायचो; पण आता दबकत दबकत बोलतोय; कारण माझा भाऊही...’

संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून बीड मतदारसंघातून निवडून आले आहेत. राज्यात महायुतीचे सरकार आले असून विकास कामांसाठी शासकीय निधीची गरज मोठ्या प्रमाणात भासणार आहे, हे लक्षात घेऊन संदीप क्षीरसागर यांनी अजित पवार यांच्याशी जवळीकता वाढवली का, अशी चर्चा या भेटीच्या निमित्ताने होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com