BJP gains in Amravati : अमरावती जिल्ह्यात भाजपचा डाव जोरात; काँग्रेसची घेतली आणखी एक विकेट !

Congress setback Amravati News : दोन दिवसांपूर्वी याच जिल्ह्यातील मोर्शी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार नरेश ठाकरे यांच्या पुत्र विक्रम ठाकरे हेसुद्धा भाजपवासी झाले आहेत.
Congress, BJP News
Congress, BJP NewsSarkarnama
Published on
Updated on

Aamravati News : अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर विधानसभा मतदारसंघात आधीच जर्जर झालेल्या काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. घाणीवाल ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे संचालक आणि काँग्रेसचे समर्पित कार्यकर्ते सलीम सेठ घाणीवाल हे भाजपमध्ये सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी याच जिल्ह्यातील मोर्शी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार नरेश ठाकरे यांच्या पुत्र विक्रम ठाकरे हेसुद्धा भाजपवासी झाले आहेत.

महाविकास आघाडीत हा मतदारसंघ उद्धव सेनेसाठी सोडण्यात आला होता. सेनेचे उमेदवार गजानन लावाटे हे निवडूनसुद्धा आले आहेत. त्यांनी तब्बल 86 हजार मते घेतली. महायुतीमध्ये हा मतदारसंघ शिंदे सेनेसाठी सोडण्यात आला होता. अभिजित अडसूळ येथून पराभूत झाले आहेत. महायुतीत असतानाही अडसूळ यांना दुसऱ्या क्रमांकाचीसुद्धा मते घेता आली नाहीत. ते फक्त 23 हजार मतांवरच थांबले.

Congress, BJP News
BJP Politics : वोट चोरीच्या वादात बावनकुळेंचं खळबळजनक वक्तव्य, थेट नागपूर महापालिकेतील भाजपच्या नगरसेवकांचा आकडाच जाहीर केला

यापूर्वी युतीत असताना हा मतदारसंघ शिवसेनेसाठी (Shivsena) सोडला जात होता. त्यामुळे आजवर भाजपला येथे आपले नेटवर्क उभे करता आले नाही. या उलट आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी येथे आपले पाळेमुळे घट्ट केली असल्याचे दिसून येते. नवनीत राणा यांनी यापूर्वीच्या लोकसभेच्या निवडणुकीत माजी खासदार आनंदराव अडसूळांना पराभूत केले होते. त्या भाजपमध्ये आल्यानंतर अडसूळ व राणा यांच्यातील वाद आणखीच वाढला होता.

Congress, BJP News
Vice President of India election process : उपराष्ट्रपती निवड कशी होते? कोणती जबाबदारी असते? कोणते निर्णय घेऊ शकतात?

लोकसभेच्या निवडणुकीत शिंदे सेनेला या मतदारसंघावर पाणी सोडावे लागले होते. त्यामुळे अडसूळांनी नवनीत राणा (Navneet Rana) यांना उघड विरोध केला होता. त्याच वेळी राणा यांच्या समर्थकांनी विधानसभेत बघून घेऊ असा इशारा दिला होता. याठिकाणी महायुती असतानाही राणा यांच्या राष्ट्रीय युवा स्वाभिमानी पक्षातर्फे येथे उमेदवार उभा करण्यात आला होता.

Congress, BJP News
Rohit Pawar News : अजित पवारांनी जर 'तो' निर्णय घेतला, तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार...! रोहित पवारांचं मोठं विधान

स्वाभिमानीचे रमेश बुंदिले यांनी दुसऱ्या क्रमांकाची 67 हजार मते घेऊन सर्वांनाच घाम फोडला होता. काँग्रेसने ही जागा उद्धव सेनेसाठी सोडली होती. युती व आघाडीच्या राजकारणामुळे काँग्रेसचे राजकीय भवितव्य दिसत नसल्याने अनेक जण पक्ष सोडून जात आहेत. सलीम सेठ घाणीवाल यांच्या रूपाने काँग्रेसची दुसरी विकेट पडल्याचे मानले जाते.

Congress, BJP News
Shivsena UBT News: उद्धव ठाकरे जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीला झुंजवणार, 'असे' आहे प्लॅनिंग!

अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि खासदार अनिल बोंडे यांच्या उपस्थितित घाणीवाल यांचा भाजप प्रवेश झाला. सलीम हे दर्यापूर नगर परिषदेच्या माजी उपाध्यक्ष जुबेदाबाई घाणीवाल यांचे पुत्र आहेत. त्यांचे वडील जिकरभाई घाणीवाल समाजसेवक असून काँग्रेसचे निष्ठावान म्हणून ओळखले जातात. घाणीवाल भाजपमध्ये आल्याने दर्यापूर मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यांच्या नेतृत्वात भाजपच्यावतीने या मतदारसंघात अल्पसंख्याकांचे संघटन उभारले जाणार असल्याचे सांगण्यात येते.

Congress, BJP News
BJP News: वाहतूक पोलिसांचा सीएम फडणवीसांच्या जवळच्या आमदाराला मोठा दणका; नेमकं काय घडलं?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com