
Nagpur News : मंत्रिमंळातून डावलल्याने नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार दोन दिवसांपासून विधानसभेत फिरकले नव्हते.
परंतु तिसऱ्या दिवशी विधानभवन परिसरात आले मात्र त्यांनी कामकाजात भाग घेतला नाही. विधानभवन परिसरात आल्यानंतर त्यांनी ‘वक्त आयेगा, वक्त जायेगा’ असे सांगून आपण आशावादी असल्याचे सांगितले.
मंत्रिमडाळात समावेश झाला नसल्याने नाराज झालेल्या मुनगंटीवार यांनी दोन दिवस अधिवेशनाला दांडी मारली. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. काल त्यांच्या समर्थनार्थ आर्य वैश्य समाजाने मोर्चा काढला. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यांना मोठी जबाबदारी देणार असल्याचे सांगितले. यावरून त्यांच्या आशा उंचावल्या असल्याचे बोलले जात आहे. मात्र कोणीतरी मुद्दामच आपले नाव कापल्याची शंकाही त्यांना आहे.
ते म्हणाले, "मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याअगोदर माझे नाव त्या यादीत आहे, हे मला सांगण्यात आले होते. 13 डिसेंबरच्या सायंकाळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) माझ्याबरोबर दोन-अडीच तास बसून चर्चा केली. तेव्हाही त्यांनी मला माझे नाव मंत्रिपदाच्या यादीत असल्याचे सांगितले". मात्र 15 डिसेंबरला काय झाले याची मला कल्पना नाही. मंत्रिमंडळाच्या यादीत असलेले नाव कसे पुसल्या गेले, कोणत्या पेनाच्या शाई वापरली होती, याचा काही उलगड झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर महायुतीमध्ये नाराजीचा स्फोट झाला आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी देखील मंत्रीपद पक्के असताना नाव कसे कटले, अशी भावना यापूर्वी व्यक्त केली. मंत्रीपद मिळाले नसल्याने मी नाराज नाही. 237 आमदारांपैकी 42 आमदारांना मंत्रिपदाची संधी प्राप्त झाली आहे. विधानपरिषदेचा एक आमदार सोडला तर विधानसभेतील 196 आमदारांना मंत्री होण्याची संधी मिळालेली नाही. त्यातलाच मी एक आहे. कोणतेही पद शाश्वत नाही. पदे मिळतात आणि जातात. भरती-ओहोटी सुरूच राहते. आता माझ्याकडे पद नाही, असे म्हणता येणार नाही. मी आमदार आहे. त्यातूनही मी जनतेची कामे करू शकतो. आजवर माझ्या मतदारसंघात जेवढी काम मी केलीत त्याचे कौतुक देश करतोय, असेही सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले.
‘वक्त आयेगा, वक्त जायेगा’, पण आपले काम करत राहिले पाहिजे. आपल्या एखाद्या कृतीतून पक्षाचे नुकसान होता कामा नये. या पक्षासाठी हजारो लोकांनी त्याग केला आहे. अशा पक्षाला नुकसान होईल, अशी कोणतीही कृती कार्यकर्त्यांनी करू नये. मी पक्षाचे काम करत राहणार असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी खुलासा केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.