
Mumbai News : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीवर माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली.
"मुख्यमंत्री यांची कोणीही भेट घेऊ शकतो. चांगली गोष्ट आहे. त्यांच्या आमूलाग्र बदल झालेला दिसतो, असे म्हणताच, याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट", असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला.
एकनाथ शिंदे म्हणाले, "निवडणुकीपूर्वी टोकाची टीका करणारे, जेलमध्ये टाकण्याची भाषा करणारे, देवेंद्र फडणवीस आणि भाजप (BJP) नेत्यांना जेलमध्ये टाकण्याचे कारस्थान करणारे, आता त्यांच्या आमूलाग्र बदल झालेला दिसतो. चांगली गोष्ट आहे. मुख्यमंत्री यांना कोणीही भेटू शकतो". यांचं कसे आहे की, याला भेट, त्याला भेट आणि दुसऱ्या दिवशी घरी थेट, अशी त्यांची परंपरा आहे, असा टोला लगावला.
लोकसभेच्या विजयानंतर त्यांनी विधानसभेच्या मंत्रिमंडळाचा वाटप देखील केले होते, असे सांगून 'ईव्हीएम'वर (EVM) बाहेर बोलण्यापेक्षा सभागृहात बोलावे. बाहेर बसून नौटंकी करायची, यातच त्यांचे समाधान मानत आहे. अधिवेशन महत्त्वाचे आहे. विदर्भातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी विरोधी पक्षांनी भांडलं पाहिजे, असा सल्ला देखील एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना दिला.
"निवडणूक आयुक्त देखील निवडून नेमावा, उद्धव ठाकरे यांची ही मागणी देखील हास्यास्पद आहे. घटनेला आव्हान देणारी आहे. भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा हा अपमान आहे. बाबासाहेबांच्या घटनेने निवडणूक आयोग, न्यायालय, सरकारी यंत्रणेची निर्मिती झाली आहे. तसे निर्णय झाले आहेत. या घटनात्मक पदांना आव्हान दिलं जात आहे. घटनाबाह्य आहे. घटनेचा आणि बाबासाहेबांचा अपमान आहे", असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
विरोधकांच्या विरोधात निकाल लागला की, 'ईव्हीएम'ला 'मविआ' दोष देते. ही दुटप्पी भूमिका असून, ती जनतेच्या नजरेतून सुटलेली नाही. 2004, 2009 मध्ये 'ईव्हीएम'वर काँग्रेस जिंकली. आता हरल्यावर 'ईव्हीएम'ला दोष देत आहे. सुप्रीम कोर्टाने देखील बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यास नकार दिल्याची आठवण एकनाथ शिंदे यांनी करून दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.