Devendra Fadnavis: पिंपरी चिंचवडमधला 'तो' युतीबाबतचा फॉर्म्युला भाजप 'स्थानिक' साठी राज्यभरात वापरणार ? मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

Local BodyElections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबई वगळता कुठेही युती होण्याची चिन्हे सध्या दिसत नाही. त्यामुळे महायुतीमधील तीनही नेत्यांच्या स्टॅटेजीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde
Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबई वगळता कुठेही युती होण्याची चिन्हे सध्या दिसत नाही. त्यामुळे महायुतीमधील तीनही नेत्यांच्या स्टॅटेजीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महायुतीचा फॉर्म्युला गुरुवारी(ता.23) नागपूरमध्ये उघड केला.

महायुतीच्या जिथे फायदा होणार असेल तिथे आम्ही एकत्रित लढू, काही ठिकाणी वेगवेगळे लढू असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी मुंबई महापालिकेची निवडणुकीत मात्र महायुती कायम राहील असे स्पष्ट केले.

मुख्यमंत्री म्हणाले, मुंबई महापालिकेचे राजकीय समीकरण वेगळे आहे. तिथे आम्हाला एकत्रितच लढावे लागणार आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये भाजप नंबर एक वर अजितदादांचा पक्ष नंबर दोनवर आहे. आम्ही एकत्र लढल्यास तिकीट न मिळालेले नाराज शरद पवार यांच्याकडे जातील. त्यांच्या पक्षातून निवडणूक लढतील. त्याचा फटका महायुतीला (Mahayuti) बसेल. त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये आम्हाला वेगवेगळे लढणे राजकीय गरज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. हाच फॉर्म्युला राज्यभर वापरला जाणार असेल तर नागपूर महापालिकेत युती होण्याची शक्यता दिसत नाही.

नागपूरमध्ये अजितदादांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची फारशी ताकद नाही. राष्ट्रवादी एकत्र असतानाही त्यांचा एक तर शिवसेनेचे फक्त दोन नगरसेवक निवडून आले होते. भाजपचे 108 नगरसेवक निवडून आले होते. विदर्भात काही विधानसभा मतदारसंघांचा अपवाद वगळता सर्वत्र भाजपचे प्राबल्य आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीची काही मर्यादित पॉकेट्समध्ये ताकद आहे. या सर्व राजकीय समीकरणाचा विचार करून महायुतीचा निर्णय होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरून दिसून येते.

Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde
Bihar Election Eknath Shinde : बिहारच्या निवडणुकीत ‘एकनाथ शिंदे’ गाजणार, पण कोंडी भाजपची होणार; गेहलोतांनी वात पेटवली...

काही ठिकाणी आमची निवडणुकीपूर्वी महायुती राहील तर काही ठिकाणी निवडणुकीनंतर केली जाईल असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर भाजपच्यावतीने स्थानिक नेत्यांना महायुतीचे अधिकार देण्यात येली असे तत्काली भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले होते.

त्यानंतर महायुतीनेच आम्ही लढू असे दावे करण्यात आले होते. आता जिथे फायद तिथे महायुती या निर्णयावर भाजप आली आहे. काँग्रेसनेसुद्धा स्थानिक नेत्यांना आघाडी करण्याचे अधिकार देण्यात आले असल्याचे जाहीर केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com