Devendra Fadnavis Politics : नागपूरकर रणजित देशमुखांची संधी हुकली, फडणवीसांनी साधली

BJP Nagpur Devendra Fadnavis Chief Minister Maharashtra : भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होताच, त्यांची विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील असे जाहीर केले.
Devendra Fadnavis Politics
Devendra Fadnavis PoliticsSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : एकेकाळी नागपूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. नागपूर शहराने अनेक बडे नेते देशाला व राज्याला दिलेत. मात्र राजाच्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसण्याचा मान फक्त देवेंद्र फडणवीस यांनाच पटकावता आला.

भाजपच्या विधिमंडळाच्या नेतेपदी त्यांची नियुक्ती होताच नागपूरमध्ये भाजप कार्यालयासमोर प्रचंड जल्लोष करण्यात आला. उद्या गुरुवारी ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची थपथ घेणार आहेत. आपला माणूस मुख्यमंत्री होत असल्याने नागपूरकर चांगलेच सुखावले आहेत.

नागपूरमधून केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आणि त्यापूर्वी काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते रणजित देशमुख यांच्याकडे भावी मुख्यमंत्री म्हणून बघितल्या जात होते. देशमुखे राज्याचे कृषिमंत्री आणि आणि नागपूरचे पालकमंत्री होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुद्धा होते. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी त्यांना मुख्यमंत्री करण्याचा शब्द दिला होता. नेमक्या त्याच निवडणुकीत देशमुख पराभूत झाले आणि त्यांची संधी हुकली. फडणवीस यांनीच त्यांना पराभूत केले होते.

Devendra Fadnavis Politics
BJP News : शपथविधी व्हायच्या आतच, हा नवनिर्वाचित आमदार लागला कामाला

राज्यात महायुतीची सत्ता आली तेव्हा नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सार्वजनिक बांधकाम खाते चांगलेच गाजवले होते. भावी मुख्यमंत्री म्हणून त्यावेळी त्यांच्याकडे बघितले जात होते. मात्र ते विधानसभेची निवडून कधीच लढले नाहीत. विधानपरिषदेतून त्यांनी थेट लोकसभेच्या निवडणुकीत उडी घेतली. निवडून येताच त्यांना मोदी सरकारने रस्ते व वाहतूक खाते दिले.

Devendra Fadnavis Politics
TOP Ten News : महापौर ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री; फडणवीसांचा थक्क करणारा प्रवास! मुंबईत मराठी माणसांवर हल्ले, वाचा महत्त्वाच्या घडामोडी...

या दरम्यान पुन्हा राज्यात भाजप-युतीची सत्ता आली. त्यावेळी फडणवीस हे प्रदेशाध्यक्ष होते. केंद्रीय नेतृत्वाने त्यांना मुख्यमंत्रीपदी बसवले. फडणवीस हे मुख्यमंत्री होणारे पहिले नागपूरकर ठरले. दुसऱ्यांचा त्यांनी पहाटे शपथ घेतली होती. मात्र त्यांचे सरकार तीन दिवसांच्यावर टिकू शकले नाही.

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. मात्र अडीच वर्षांतच पुन्हा सत्तापालट झाली. मुख्यमंत्री शिंदे चाळीस आमदार घेऊन महायुतीत सहभागी झाले. त्यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवार हेसुद्धा आपले आमदार घेऊन महायुतीत सहभागी झाले. त्यावेळीसुद्धा फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील असे चित्र होते. स्वतः एकनाथ शिंदे हेसुद्धा फडणवीस हेच आमचे नेते असल्याचे सांगत होते.

मात्र भाजपने शिंदे यांना मुख्यमंत्री करून सर्वांनाच धक्का दिला होता. फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपद देऊन भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने भाजपच्या पक्ष बांधणीची जबाबदारी फडणवीस यांच्यावर सोपवली होती. ती यशस्वीपणे पार पाडताच पुन्हा त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ टाकण्यात येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com