BJP News : शपथविधी व्हायच्या आतच, हा नवनिर्वाचित आमदार लागला कामाला

Wardha Arvi Assembly Constituency BJP MLA Sumit Wankhede : वर्धा जिल्ह्यातील आर्वी विधानसभा मतदारसंघातून प्रथमच निवडून आलेले नवनिर्वाचित आमदार सुमित वानखेडे यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
MLA Sumit Wankhede
MLA Sumit WankhedeSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : विधानसभेत निवडून आलेले जवळपास सर्वच आमदार शपथिविधीची वाट बघत आहेत. काही आमदार थकवा घालवण्यासाठी पिकनिकला गेलेत. पराभूत झालेले 'ईव्हीएम'ला दोष देत आहेत.

मात्र सर्व घडामोडीत वर्धा जिल्ह्यातील आर्वी विधानसभा मतदारसंघातून प्रथमच निवडून आलेले नवनिर्वाचित आमदार सुमित वानखेडे यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

निवडणुकीपूर्वी काही योजना वर्धा विधानसभा मतदारसंघाच्या मतदारांसाठी त्यांनी हाती घेतल्या होत्या. त्याचा आढावा ते घेत आहेत. शपथविधी झाल्यांतर त्यांना अधिकृतपणे अधिकाऱ्यांसोबत बैठका घेता येणार असल्या, तरी त्यांनी आत्तापासूनच कामाची पूर्वतयारी करून ठेवली आहे. सुमित वानखेडे प्रथमच आमदार झाले असले, तरी ते सर्व परिचित आहेत. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना ते त्यांचे स्वीय सहायक होते. येथूनच त्यांना राजकारणात गोडी निर्माण झाली. फडणवीस यांनीसुद्धा त्यांना राजकारणात येण्यासाठी प्रोत्साहन दिले आणि सुमित यांच्या राजकीय प्रवासाला सुरवात झाली.

MLA Sumit Wankhede
Markadwadi Ballot Paper Voting : मारकडवाडी बॅलेट मतदानाबाबत मोठी अपडेट; आमदार जानकरांनी घेतला 'हा' निर्णय

वर्धा येथे भाजपचे (BJP) दादाराव केचे विद्यमान आमदार असल्याने सहाजिकच वानखेडे यांच्यासमोरसुद्धा सुरवातीला पेच निर्माण झाला होता. तो त्यांनी अतिशय संयमाने आणि शांततेने हाताळला. ज्येष्ठ नेते नाराज होणार नाही, याची काळजी घेतली. दादाराव केचे यांना पक्षाने सुद्धा विश्वासात घेतले. त्यांची सन्मानाने प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली. त्यामुळे वानखेडे यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला.

MLA Sumit Wankhede
Congress Politics : काँग्रेस प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आळवला सूर; नाना पटोले हटाव काँग्रेस बचाव

सहा महिन्यांपूर्वी लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला वर्धा लोकसभा मतदारसंघात मोठा फटका बसला होता. महाविकास आघाडीचे अमर काळे येथून निवडून आले. त्यांच्या आर्वी विधानसभा मतदारसंघात काळे यांना तब्बल 20 हजारांचे मताधिक्य होते. ही आकडेवाडी बघता भाजपचे काही खरे नाही असेच बोलले जात होते. त्यातही विद्यामान आमदारांना डावलून नवा चेहरा भाजपने दिल्याने आणखीच शंका-कुशंका व्यक्त केल्या जात होत्या. मात्र सुमित यांनी तब्बल 60 हजारांच्या मताधिक्यांनी विजय मिळवून भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास सार्थ ठरवला.

आमदार होण्यापूर्वीच सुमित वानखडे यांनी आर्वी विधानसभा मतदारसंघासाठी काही योजना जाहीर केल्या होत्या. त्याकरिता राज्य सरकारने कोट्यवधीचा निधीसुद्धा मंजूर केला होता. यावरून तत्कालीन लोकप्रतिनिधींसोबत त्यांचे मतभेद निर्माण झाले होते. घटनाबाह्य शक्ती केंद्राचा आरोपही केला होता. मात्र आता हे सर्व वाद निकाली निघाले आहेत. आर्वी मतदारसंघासाठी मल्लनिस्सारण केंद्र, पाणी पुरवठा जलवाहिनी आणि आर्वी-तळेगाव रस्त्याचे बांधकाम हाती घेण्यात आले होते. याचे सर्व सोपस्कार आधीच पार पडले आहेत.

हे सर्व प्रकल्प पूर्ण करणे हेच आव्हान आमदार सुमित वानखडे यांच्यासमोर आहे. दहा डिसेंबररला नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडल्यानंतर वानखेड यांनी या सर्वा कामांना गती देऊन पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे. विशेष म्हणजे सुमित वानखेडे यांनी विद्यामान खासदार अमर काळे यांच्या पत्नी मयुरा काळे यांचा पराभव केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com