
Nagpur, 25 January : विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे, त्यामुळे आघाडीचे नेते आता ईव्हीएमवर खापर फोडत आहेत. आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रचाराससाठी त्यांच्याकडे काहीच मुद्दा नाही, त्यामुळे ईव्हीएम सेट केल्याचा नवा नॅरेटिव्ह काँग्रेसच्या वतीने केला जात आहे. आज पुकारण्यात आलेले आंदोलन म्हणजे काँग्रेसचे फोटोसेशन असल्याची खिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उडवली.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीत जेव्हा आम्हाला फटका बसला, तेव्हा आम्ही ईव्हीएमला दोष दिला नाही. त्याऐवजी आत्मपरीक्षण केले. झालेल्या चुका टाळल्या. लोकांमध्ये गेलो. त्यांच्या मागण्या आणि गरजा जाणून घेतल्या. भाजप आणि महायुतीने विधानसभेच्या निवडणुकीची काय काय तयारी केली, याची माहिती आम्ही वारंवार दिली आहे.
सायंकाळी वाढलेल्या मतदानाची सविस्तर माहितीही खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात विरोधकांना दिली. निवडणूक आयोगानेसुद्धा ईव्हीएम (EVM) सेट करून दाखवा, असे उघड आव्हान केलं होतं. मात्र, त्यांच्याकडे कोणी गेले नाही आणि आता आंदोलने केली जात आहे. हा पब्लिसिटी स्टंट आहे. नवा नॅरेटिव्ह सेट केला जात आहे, असेही बावनकुळे यांनी सांगितले.
इंडिया आघाडीतील नेत्यांमध्ये ईव्हीएमबाबत मतभेद आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हा विषय बंद करण्याचा सल्ला दिला आहे. असे असतानाही वारंवार तो मुद्दा काँग्रेसतर्फे मांडला जात आहे. मात्र, आता त्यांच्या आंदोलनाने फार काही फरक पडणार नाही. जनतेने महायुतीला भरभरून मतदान केले आहे. जनतेने आमच्यावर विश्स टाकला. त्यामुळे महाविकास आघाडीला धक्का बसला आहे.
महाविकास आघाडी अद्यापही पराभवाचा मानसिकतेतून बाहेर निघायला तयार नाहीत. काँग्रेसमधील अंतर्गत लाथाळ्यांनी गमावलेला विश्नास परत मिळणार नाही, असा दावाही बावनकुळे यांनी केला आहे.
संजय राऊत डोक्यावर पडलेले व्हॅल्युअर
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत डोक्यावर पडलेले व्हॅल्युअर आहेत. कोराडी जगदंबा मंदिराचे आम्ही नूतनीकरण केले. ते म्हणतात की सहाशे कोटींची जमीन दिली. मी त्यांना मंदिरात बोलावून ६०० कोटींची जमीन दाखविण्यास सांगणार आहे. त्या जमिनीचा बाजार भाव चार कोटी तीस लाख रुपये आहे. आता ९० लाख रुपये संस्थेमार्फत भरण्यात आले आहेत, असेही चंद्रशेखर बाबनकुळे यांनी एक रुपयांत जमीन घेतल्याच्या आरोपवर स्पष्टीकरण दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.