Bombay High Court : शिक्षिकेचा 'मॅनेज' केलेला बनाव मुंबई हायकोर्टाने उधळला : नामांकित शाळा अध्यक्षांविरोधातील विनयभंगाचा गुन्हा रद्द

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शिक्षिकेच्या तक्रारीतील विलंब आणि कारणांतील विसंगतींचा उल्लेख करत शास्त्रज्ञ तथा शाळा अध्यक्षांविरुद्धचा विनयभंग व लैंगिक छळाचा गुन्हा रद्द केला.
The Nagpur Bench of the Bombay High Court quashed a molestation case against a scientist, observing that the delay in filing the complaint was not satisfactorily explained.
The Nagpur Bench of the Bombay High Court quashed a molestation case against a scientist, observing that the delay in filing the complaint was not satisfactorily explained.Sarkarnama
Published on
Updated on

विनयभंगाची कथीत घटना घडल्यानंतर शिक्षिकेकडून सहा दिवसांनी तक्रार दाखल करण्यात आली. विलंबासाठी 'मांजरीने चावा घेतल्यामुळे विश्रांती घेत होती' हे दिलेले कारण ग्राह्य वाटत नाही, कारण त्या कालावधीत ती नियमितपणे शाळेत जात होती, असे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वैज्ञानिक असलेल्या शाळेच्या अध्यक्षाविरुद्धचा विनयभंग व लैंगिक छळाचा गुन्हा रद्द केला.

खामगाव येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याविरोधात मुंबई येथील वैज्ञानिक मोहम्मद अतिकुर रहमान (वय ५२) यांनी अॅड. राहील मिर्झा यांच्यामार्फत अर्ज दाखल केला होता. अर्जदार हे खामगाव येथील एका नामांकित खासगी शाळेचे अध्यक्ष आहेत. या प्रकरणावर न्यायमूर्ती वृषाली जोशी यांच्या समक्ष सुनावणी झाली. तक्रारीनुसार, शिक्षिका गेल्या वर्षभरापासून शाळेत भौतिकशास्त्र व गणित विषय शिकवत होती. २६ जुलै २०२५ रोजी अध्यक्षांनी कार्यालयात बोलावून तिच्याशी गैरवर्तन केले, अंगाला स्पर्श केला तसेच धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला होता.

या प्रकरणी ३१ जुलै रोजी गुन्हा नोंदविण्यात आला. शिक्षिकेला अध्यापन पद्धती व शिस्तीबाबत समज दिल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. कथित घटनेनंतर शिक्षिका आणि शाळा प्रशासनामध्ये झालेल्या ई-मेल पत्रव्यवहारात लैंगिक छळाचा कोणताही उल्लेख नव्हता, असा युक्तिवाद अर्जदारांतर्फे करण्यात आला. उलट ती पुन्हा कामावर रुजू होण्यासाठी प्रयत्न करत होती. नोकरी जाण्याच्या भीतीतून आणि सूडबुद्धीने तक्रार दाखल करण्यात आल्याचा दावा करण्यात आला. या सर्व बाबींचा विचार करता आरोपीविरुद्ध प्रथमदर्शनी गुन्हा सिद्ध होण्यासाठी पुरेसा आधार नसल्याचे नमूद करून न्यायालयाने गुन्ह्याचे दोषारोपपत्र आणि खामगाव न्यायालयात प्रलंबित असलेली फौजदारी कार्यवाही रद्द करण्याचा आदेश दिला.

The Nagpur Bench of the Bombay High Court quashed a molestation case against a scientist, observing that the delay in filing the complaint was not satisfactorily explained.
TET Exemption: शिक्षकांच्या सेवासुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पंतप्रधानांकडे धाव, 2013 पूर्वीच्या शिक्षकांना टीईटीमधून सूट मिळणार?

ई-मेलमध्ये विनयभंगाचा उल्लेख नाही

घटनेनंतर पाठविण्यात आलेल्या ई-मेलमध्ये अध्यक्षांनी मोठ्या आवाजात बोलल्याचा उल्लेख असला तरी लैंगिक स्वरूपाच्या कोणत्याही गैरवर्तनाचा उल्लेख नव्हता, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदविले. ३० जुलै रोजी तक्रारदाराच्या भावाने शाळेत येऊन गोंधळ घातल्यानंतर दुसऱ्याच दिवशी गुन्हा दाखल करण्यात आल्याकडेही न्यायालयाने लक्ष वेधले. त्यानुसार, तक्रार दाखल करण्यास झालेला विलंब, ई-मेलमधील मजकूर आणि प्रकरणातील परिस्थिती लक्षात घेता आरोपीविरुद्ध प्रथमदर्शनी गुन्हा सिद्ध होत नसल्याचे न्यायालयाने नमूद केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com