BRS News : कांद्यानंतर महाराष्ट्रातील दूधही घेणार तेलंगणा सरकार... !

Maharashtra : दुधाचे भाव साधारणतः ८ रुपये प्रतिलीटरने कमी करण्यात आले.
Onion and Milk
Onion and MilkSarkarnama
Published on: 
Updated on: 

Farmers produce 1 crore 40 lakh liters of milk in Maharashtra : महाराष्ट्रात साधारण १ कोटी ४० लाख लीटर दुधाचे उत्पादन शेतकरी करतात. गेल्या १५ ते २० दिवसांपासून शेतकऱ्यांची स्थिती पाहिली तर लक्षात येते की, दुधाचे भाव साधारणतः ८ रुपये प्रतिलीटरने कमी करण्यात आले. पण ते का कमी केले, हे कळायला मार्ग नाही. (Milk prices were reduced by around Rs. eight per litre)

भांडवलदारांनी कृत्रिम पद्धतीने दुधाचे दर घसरवल्याचे प्रथमदर्शनी लक्षात येत आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र सरकारची याकडे डोळेझाक आहे. तेलंगणामध्ये चौकशी केली असता, तेथे महाराष्ट्रापेक्षा १० ते ११ रुपयांनी दुधाचे दर जास्त असल्याचे लक्षात आले. त्यामुळे आता कांद्यापाठोपाठ महाराष्ट्रातील दुधही तेलंगणात जाणार असल्याचे भारत राष्ट्र समितीचे समन्वयक बी.जे. देशमुख यांनी सांगितले.

महाराष्ट्रात दुधाचे भाव कृत्रिमपणे भांडवलदारांकडून कमी करण्यात आल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र अशा परिस्थितीत महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांकडे (Farmers) डोळेझाक करत आहे. यामुळे महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकरी पूर्णतः हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीमध्ये तेलंगणा राज्यात दुधाच्या दराबाबत चौकशी केली असता तेथे दुधाचे दर हे १० ते ११ रुपयांनी जास्त असल्याची माहिती मिळाली.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांना महाराष्ट्रातील घसरलेल्या दूध दराबाबत माहिती दिली असता, त्यांनी आमचे सरकार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे दूध खरेदी करणार असल्याचे सांगितले. तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांना दुधाचे दर चांगले मिळतात. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही दुधाचा वाढीव दर मिळावा म्हणून के. चंद्रशेखर राव यांनी दूध डेअरी डेव्हलपमेंट विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आणि तात्काळ कामाला लावल्याचे देशमुख यांनी सांगितले.

Onion and Milk
KCR Nagpur News : जर लोकांना शंका असेल नकोच ती ईव्हीएम !

काही प्रमाणात का होईना महाराष्ट्र राज्यातील दूध खरेदी व वाढीव दर देऊन महाराष्ट्रातील दूध तेलंगणा राज्यात आणण्याबाबत प्रभावी उपयोजना आणि त्यावर तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश केसीआर यांनी दिले आहेत. महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. याला प्रशासन व राज्यकर्ते (State Government) जबाबदार असल्याचा आरोप बी.जे. देशमुख यांनी केला आहे.

कांदा उत्पादकांचीही स्थिती अशीच झाली होती. केसीआर यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील (Maharashtra) काही ठिकाणचा कांदा हा आता तेलंगणा राज्यातील व्यापारी घेत आहेत. तसेच चांगला दरही देत आहेत. महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना दिलासा दिल्यानंतर केसीआर सरकार आता दूध उत्पादकांनाही चांगले दर देणार असल्याचे देशमुख म्हणाले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.