Prataprao Jadhav Lok Sabha Winner: बुलडाण्याच्या गडावर जाधवांचा 'प्रताप'

Buldana Lok Sabha Election Result 2024 Live: बुलडाणा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार प्रतापराव जाधव विजयी झाले आहेत.
Prataprao Jadhav
Prataprao JadhavSarkanama

Buldana Lok Sabha Election Result 2024: बुलडाणा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार प्रतापराव जाधव विजयी झाले आहेत. बुलडाणा मतदारसंघात शिंदेंची शिवसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना अशी थेट लढत झाली होती. तर बुलडाणा मतदारसंघातील मतदारांनी शिंदेच्या शिवसेनाला विजयी केलं आहे.

बुलडाणा लोकसभा (Lok Sabha) मतदारसंघात 1999 पासून पुन्हा सलग शिवसेनेचा उमेदवार निवडून येत आहे. मात्र, यंदाची लोकसभेची निवडणूक ही शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतरची होती. त्यामुळे यंदा दोन शिवसेना मैदानात उतरल्या होत्या. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख नरेंद्र खेडेकर आणि शिंदेसेनेचे प्रतापराव जाधव यांच्यात अत्यंत चुरशीची लढत झाली.

एककीडे शिवसेना (शिंदेगट) विरुद्ध शिवसेना (ठाकरे गट) असा सामना रंगला असतानाच रविकांत तुपकरांनी यांनीदेखील बुलडाणा लोकसभेच्या रिंगणात उडी घेतली. त्यामुळे इथे तिरंगी लढत झाली होती. मात्र, आज मतमोजणीत बुलडाण्याचा गड हा शिंदेंच्या शिवसेनेचा असल्याचं सिद्ध झालं आहे.

Prataprao Jadhav
Ravindra Waikar Win : मुंबईत मोठा ट्विस्ट! रवींद्र वायकारांचं नशीब फळफळलं

मागील 25 वर्षांपासून बुलडाणा मतदारसंघावर शिवसेनाचा भगवा फडकत आहे. आनंदराव अडसूळ सलग दोन तर प्रतापराव जाधव तीनवेळा इथून विजयी झाले होते. तर आता 2024 मध्येही प्रतापराव जाधव हे पुन्हा खासदार म्हणून या मतदारसंघातून निवडून आले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com