Prataprao Jadhav Vidyadhar Mahale : ‘जादू की झप्पी’ अन् बुलढाण्यात नवी राजकीय समीकरणं?

Jadhav-Mahale meeting fuels political speculation in Buldhana : प्रतापराव जाधव यांनी विद्याधर महाले यांना भर मंचावर दिलेली मिठी चर्चेत; संजय गायकवाडांच्या चिखलीतील सक्रियतेनंतर महायुतीतील स्थानिक राजकीय हालचालींना वेग?
Prataprao Jadhav Vidyadhar Mahale
Prataprao Jadhav Vidyadhar MahaleSarkarnama
Published on
Updated on

Buldhana political news : बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणात महायुतीतील स्थानिक वर्चस्वाचा संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे.

चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले आणि बुलढाण्याचे एकनाथ शिंदे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्यातील राजकीय मतभेद अधूनमधून उघडपणे समोर येत असतानाच, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी चिखलीतील दहीहंडी उत्सवात विद्याधर महाले यांना दिलेली ‘जादू की झप्पी’ चर्चेचा विषय ठरली आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जाधव आणि महाले यांच्यातील ही जवळीक कोणता राजकीय संदेश देते, याबाबत जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क सुरू आहेत. महायुतीतीलच (Mahayuti) एका नेत्याचे स्थानिक पातळीवरील वाढते राजकीय वजन संतुलित करण्यासाठी जाधव यांनी भाजपच्या महाले गटाशी जवळीक साधत आहेत का? असाही सवाल उपस्थित केला जात आहे. मात्र, या राजकीय चर्चांना अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही.

काही दिवसांपूर्वी संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी आमदार श्वेता महाले यांच्या चिखली विधानसभा मतदारसंघात बुलढाणा नगरपालिकेचे गटनेते कुणाल गायकवाड यांचा वाढदिवस साजरा केला होता. या कार्यक्रमात गायकवाड यांनी ‘आग्यामोहोळ’ उठविण्याची भाषा करत महाले गटाच्या राजकीय प्रभावाला थेट आव्हान दिल्याची चर्चा झाली. राजकीयदृष्ट्या महाले यांचा प्रभाव असलेल्या चिखलीत गायकवाड यांनी केलेली ही राजकीय सक्रियता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मानली जात आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून महाले गटानेही बुलढाण्यात राजकीय ताकद दाखविण्याचा प्रयत्न केल्याचे चित्र आहे.

Prataprao Jadhav Vidyadhar Mahale
MPSC Students Protest Pune : ‘आयोगराव, पेपर फुटणे हा हलकटपणा’; पुण्यात MPSC विद्यार्थ्यांच्या पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

आमदार श्वेता महाले यांच्याकडूनही संघटनात्मक पातळीवर आक्रमक हालचाली सुरू असल्याचे दिसून येत आहे. विद्याधर महाले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यासह विविध राजकीय नेत्यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली.

Prataprao Jadhav Vidyadhar Mahale
Gopichand Padalkar HSRP Number Plate : पडळकरांच्या वाहनावर HSRP नंबर प्लेट नाही; प्रश्न होताच म्हणाले, ‘बनवायला दिली आहे’

काँग्रेसचे नेते राहुल बोंद्रे यांच्यासह विविध नेत्यांशी महाले गटाची वाढती जवळीकही स्थानिक राजकारणात चर्चेचा विषय आहे. त्यामुळे विद्याधर महाले यांची सार्वजनिक राजकीय सक्रियता वाढणार का, याकडेही राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. आतापर्यंत तुलनेने पडद्यामागे राहिलेल्या विद्याधर महाले यांच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या प्रमाणावर झालेला राजकीय मेळावा आणि त्यात विविध नेत्यांची उपस्थिती यामुळे त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत चर्चा सुरू झाली आहे.

विशेष म्हणजे, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी भर मंचावर विद्याधर महाले यांना दिलेली ‘जादू की झप्पी’ या संपूर्ण घडामोडीतील सर्वाधिक चर्चेचा क्षण ठरला. जाधव हे बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणातील अनुभवी नेते असल्याने त्यांच्या या सार्वजनिक जवळीकीकडे राजकीय संकेत म्हणून पाहिले जात आहे. मात्र, या भेटीमागे कोणतेही विशिष्ट राजकीय समीकरण असल्याचे जाधव किंवा महाले यांच्याकडून अधिकृतपणे सांगण्यात आलेले नाही.

महायुतीत स्थानिक पातळीवर रस्सीखेच?

भाजप आणि एकनाथ शिंदे शिवसेना हे राज्यात महायुतीचे घटक पक्ष आहेत. त्यामुळे सार्वजनिक व्यासपीठांवर एकजुटीचा संदेश दिला जात असला, तरी बुलढाणा जिल्ह्यात स्थानिक राजकीय प्रभाव वाढविण्यासाठी नेत्यांमध्ये स्पर्धा असल्याचे चित्र विविध घडामोडींमधून समोर येत आहे.

‘जादू की झप्पी’,राजकीय समीकरणांची चाहूल

एकीकडे संजय गायकवाड यांची चिखलीतील राजकीय सक्रियता, तर दुसरीकडे महाले गटाची बुलढाण्यातील उपस्थिती आणि आता प्रतापराव जाधव यांची विद्याधर महाले यांच्याशी झालेली जवळीक, या घडामोडींमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बुलढाण्यातील राजकीय समीकरणांबाबत उत्सुकता वाढली आहे. त्यामुळे ‘जादू की झप्पी’ ही केवळ राजकीय आपुलकी होती की त्यामागे भविष्यातील राजकीय समीकरणांची चाहूल आहे, याचे उत्तर आगामी काळातील घडामोडींमधूनच स्पष्ट होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com