CDCC News : चंद्रपूर जिल्हा बॅंकेतील अनियमितता; संचालकांकडून होणार वसुली?

Chandrapur : जिल्हा उपनिबंधकांकडे या सर्वांना लेखी स्पष्टीकरण सादर करायचे आहे.
Chandrapur District Central Cooperative Bank.
Chandrapur District Central Cooperative Bank.Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Irregularities in Chandrapur District Bank News : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील सन २०१६ ते २०१९ या काळात तीन कोटी १६ लाख ५५ हजार रुपयांची अनियमितता झाल्याचे अंकेक्षण अहवालात समोर आले आहे. या प्रकरणात बॅंकेचे विद्यमान अध्यक्ष संतोष रावत, माजी अध्यक्ष मनोहर पाऊणकर यांच्यासह संपूर्ण संचालक मंडळ आणि सहा माजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. (Three Crore 16 Lakh 55 thousand Irregularity in Chandrapur District Bank)

आज (ता. नऊ) सायंकाळी ६ वाजेपर्यंत यासंदर्भात जिल्हा उपनिबंधकांकडे या सर्वांना लेखी स्पष्टीकरण सादर करायचे आहे. अन्यथा सर्वांना वसूलपात्र रक्कम मान्य आहे, असे गृहीत धरुन कारवाई केली जाणार आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे तत्कालीन अध्यक्ष मनोहर पाऊणकर यांना अनुकंपा तत्त्वावरील नोकर भरती प्रकरणात अटक झाली होती. त्यांच्या कार्यकाळातील आर्थिक व्यवहाराचे लेखापरीक्षण करण्याचे आदेश २४ जून २०२२ रोजी तत्कालीन विभागीय निबंधक प्रवीण वानखेडे यांनी दिले.

जिल्हा विशेष लेखापरीक्षक एस. गोडे यांनी लेखापरीक्षण केले. विभागीय सहनिबंधकांकडे अहवाल सोपवला. या अहवालात अनेक गंभीर बाबी आढळून आल्या आहेत. यात प्रामुख्याने चंद्रपूर शहरातील बॅंकेच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या नूतनीकरणावर अतिरिक्त पैसे खर्च करण्यात आले. कंत्राटदारांना एक कोटी १७ लाख ११ हजार ४०९ रुपये अतिरिक्त दिले. ग्रामीण भागात आवश्यक नसताना बँकेकडून नव्या इमारती बांधण्यात आल्या. यासाठी तब्बल १ कोटी ९१ लाख ५९ हजार ५३ रुपयांची कंत्राटदाराला खैरात वाटण्यात आली.

रक्षक सिक्युरिटी सर्व्हिसला सुरक्षारक्षक पुरविण्याचे कंत्राट देण्यात आले. प्रत्येक महिन्याला बँकेच्या वेगवेगळ्या शाखेत ९३ सुरक्षारक्षक पुरवण्याचे कंत्राट होते. मात्र, २०१७ ते २०१९ याकाळात तब्बल ५५० अतिरिक्त सुरक्षारक्षक तैनात केले गेले. त्यासाठी ५७ लाख ९० हजार ३९० रुपये अतिरिक्त देयक बँकेने कंत्राटदाराला दिले. याच रक्षक सिक्युरिटीला सशस्त्र सुरक्षारक्षकाचे कंत्राट निविदा न काढता देण्यात आले.

Chandrapur District Central Cooperative Bank.
Chandrapur BJP Assembly Election: भाजपचा नवा डाव; मनसेच्या नेत्यालाच केलं वरोरा विधानसभेचा प्रमुख

तीन वर्षांत १३५ अतिरिक्त सशस्त्र सुरक्षा रक्षक बँकेत तैनात करण्यात आले. त्यासाठी २१ लाख ९४ हजार ५९१ रुपयांची उधळपट्टी केली. सुरक्षारक्षक आणि सशस्त्र सुरक्षा रक्षकांसाठी ७९ लाख ८४ हजार ९८१ रुपये अतिरिक्त दिले. या सर्व कामांना संचालक मंडळाची मंजुरी होती. त्यामुळे आता बँकेच्या (Bank) आजी- माजी अध्यक्ष व २७ संचालक तथा सहा माजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर जिल्हा उपनिबंधकांनी जबाबदारी निश्चित केली आहे.

या सर्व संचालक मंडळांना ११ एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता जिल्हा उपनिबंधक कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून लेखी स्पष्टीकरण सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार ११ एप्रिलच्या सुनावणीत संचालक मंडळ व तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी (CEO) लेखी म्हणणे सादर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे देण्याची विनंती केली होती. त्यानुसार उपनिबंधक कार्यालयाने कागदपत्रांच्या प्रती पुरविल्या आहेत.

Chandrapur District Central Cooperative Bank.
Bypoll Election: निवडणूक आयोग काय निर्णय घेणार ? | Pune - Chandrapur Bypoll Election | Sarkarnama

आता या सर्व संचालक आणि माजी मुख्याधिकाऱ्यांना चंद्रपूर (Chandrapur) जिल्हा उपनिबंधक पी. एस. धोटे यांनी नोटीस बजावली आहे. यात आज लेखी निवेदन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, या कार्यालयात सादर करायचे आहे. विहित मुदतीत लेखी स्पष्टीकरण सादर न केल्यास उपरोक्त वसूल पात्र रक्कम मान्य आहे असे गृहीत धरून वैधानिक कार्यवाही करण्यात येईल, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे.

विद्यमान अध्यक्षांवरही जबाबदारी..

या प्रकरणी विद्यमान अध्यक्ष संतोष रावत, माजी अध्यक्ष मनोहर पाऊणकर, रवींद्र शिंदे, शेखर धोटे, संचालक यशवंत तुकाराम दिघोरे, प्रभा वासाडे, पांडुरंग जाधव, चंद्रकात गहूकर, अनिल वाढई, गजानन पाथोडे, संजय तोटावार, दिलीप नलगे, प्रकाश बन्सोड, विजय बावणे, विजय देवतळे, संदीप गड्डमवार, उल्हास करपे, राजेश रघाताटे, ललित मोटघरे, दामोधर रुयारकर, नंदा अल्लुरवार, पुंडलिकराव कढव, श्रीमती शारदा अनिल खनके, सुचित्रा अन्नाजी ठाकरे, श्रीपाद पाटील, संजय सिंगम, सुरेश दहीकर आणि तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी एस. जी. बरबटकर, एम. व्ही. पोटे, एस. अर्जुनकर, एस. दुबे, एस. जी. चिलमुलवार, सी.आर. नाईक यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Satara Dcc Bank Election
Ahilyanagar DCC Bank Chairman
Maharashtra Cooperative Elections | Director Term Extension | Drought
Kolhapur District Central Cooperative Bank election