Chandrapur News : वडेट्टीवार, धानोरकर, जोरगेवार यांच्यासह मातब्बरांना सहकाराचे वेध : मुख्यमंत्री फडणवीसांच्या काकूंचेही यादीत नाव!

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, प्रतिभा धानोरकर, भाजप नेते किशोर जोरगेवार आणि शोभाताई फडणवीस यांची मतदार म्हणून नावे आहेत.
Chandrapur District Central Cooperative Bank elections.
Chandrapur District Central Cooperative Bank elections.Sarkarnama
Published on
Updated on

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी नुकतीच 15 तालुक्यातील तब्बल नऊशे मतदारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यापासून भाजप आमदार किशोर जोरगेवार यांच्यापर्यंत सर्वपक्षीय मातब्बर राजकीय नेत्यांचा समावेश आहे. येत्या आठवड्यात बँकेच्या निवडणुकीची अधिसूचना निघण्याची शक्यता आहे.

न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच प्रारूप मतदार यादीवरील स्थगिती हटविली आणि 22 मेपर्यंत अंतिम यादी प्रसिद्ध करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. त्यानुसार ही यादी प्रसिद्ध करण्यात आली. जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयात मतदारांची ही यादी लावण्यात आली आहे. या यादीत काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षातील मातब्बर नेत्यांचा समावेश आहे.

आजवरच्या इतिहासात प्रथमच माजी-आजी लोकप्रतिनिधींनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत रस दाखविला आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पालिका निवडणुकींकडे लक्ष देण्याऐवजी बँकेचे समीकरण जुळविण्यात हे नेते रमले आहे. अंतिम यादीत मतदार म्हणून काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर, भाजप आमदार किशोर जोरगेवार, माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांची नावे आहेत.

Chandrapur District Central Cooperative Bank elections.
Amravati Airport : फडणवीसांकडून दीड महिन्यांपूर्वी विमानतळाचे वाजतगाजत उद्घाटन : पहिल्याच पावासाने चिखल; मुंबईची फेरी रद्द

हे सारे नेते आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार अथवा नाही याबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. दुसऱ्या बाजूला बँकेचे माजी संचालक सुभाष रघाताटे यांचे नाव मतदार यादीतून गळ्यात आले. त्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.

Chandrapur District Central Cooperative Bank elections.
Kolhapur News: कोल्हापूरकरांसाठी मोठी बातमी; हद्दवाढीचा मार्ग मोकळा..? शिंदेंच्या आमदाराने दिली महत्त्वाची अपडेट

याशिवाय बँकेचे माजी अध्यक्ष संजय डोंगरे, माजी आमदार सुदर्शन निमकर, अँड. वासुदेव खेळकर, वसंत विधाते, जी. के. उपरे, रामनाथ कालसर्पे, बाजार समितीचे माजी सभापती दिनेश चोखारे, शामकांत थेरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. सतीश वारजूरकर, काँग्रेस पक्षातून भाजपात आलेले प्रकाश देवतळे यांचीही नावे मतदार यादीत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com