भाजप आमदाराचा डाव प्रशासनाने हाणून पाडला, आईच्या नावाने बांधलेले अम्मा स्मारक अवैध ठरवून हटवले

illegal Amma Memorial construction : भाजपचे चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांना प्रशासनाने मोठा धक्का देताना त्यांच्या आईच्या नावाने होणारे बांधकाम अवैध ठरवले आहे.
illegal Amma Memorial construction And Kishor Jorgewar
illegal Amma Memorial construction And Kishor Jorgewarsarkarnama
Published on
Updated on

Summary :

  1. चंद्रपूर आमदार किशोर जोरगेवार यांच्या आईच्या नावाने बांधलेले अम्मा स्मारक अवैध ठरवून प्रशासनाने हटवले.

  2. "मी म्हणेल तो कायदा" अशी भूमिका घेणाऱ्या जोरगेवार यांना या कारवाईने मोठा धक्का बसला आहे.

  3. या निर्णयामुळे जिल्ह्यात जोरदार राजकीय चर्चा सुरू झाली असून त्यांच्या प्रतिमेला फटका बसला आहे.

Chandrapur News : 'मी म्हणेल तो कायदा' म्हणणारे भाजपचे चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांना प्रशासनाने मोठा झटका दिला आहे. त्यांच्या आईच्या नावाने उभारण्यात येत असलेल्या अम्मा स्मारकाच्या बांधकामाला अवैध ठरवून ते हटवण्यात आले आहे.

शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या महात्मा गांधी चौकाचे नाव बदलून अम्मा जोरगेवार करण्याचा प्रस्ताव चंद्रपूर पालिकेला देण्यात आला होता. त्याविरोधात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. सोबतच याच चौकात उभारल्या जात असलेले अम्मा स्मारक अवैध असल्याचीही तक्रार करण्यात आली होती. हे स्मारक महापालिकेच्या सात मजली इमारतीला लागून बांधले जात आहे. जोरगेवार यांच्या आई अम्मा जोरगेवार याचा चौकात टोपल्या विकायच्या. त्यामुळे त्यांनी या जागेची स्मारकासाठी निवड केली आहे.

illegal Amma Memorial construction And Kishor Jorgewar
Kishor Jorgewar : राजकीय वादाने घेतला आमदार किशोर जोरगेवारांच्या ‘अम्मा की पढाई’चा बळी

भर चौकात आणि व्यावसायिक इमारतीच्या शेजारी स्मारक उभारले जात असलेल्या या स्मारकाला येथील व्यापाऱ्यांचा विरोध केला होता. या विरोधात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन यास विरोध केला होता. आयुक्तांनी अवैध स्मारक तोडण्याचे आश्वासन दिले दिले होते. तर नामकरण आणि स्मारकाचा मुद्दा संवेदनशील झाला होता.

गोवा मुक्ती आंदोलनात शहीद झालेले बाबूराव थोरात तसेच स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्यांचे शहरात कुठेच नाव दिसत नाही. मात्र आमदाराच्या आईच्या स्मारकाचे काम तातडीने केले जात असल्याची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. हा शहीद व स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान नाही का? असा उद्विग्न सवाल त्यांनी केला होता.

शहीद बाबूराव थोरात यांचे पुत्र विजय थोरात यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी स्वातंत्र्यवीर आणि शहिदांच्या नावाचीसुद्धा यादी जोडली. दरम्यान आमदार जोरगेवार यांच्या कार्यालयाच्यावतीने आमदारांनी गांधी चौकाचे नाव बदलण्याचा प्रस्ताव दिला नसल्याचा खुलासा केला होता.

स्मारकाचा वाद चिघळत असल्याने भारतीय पुरातत्त्व विभागाने याची दखल घेतली. स्मारकाच्या शेजारी एक प्राचीन मंदिर आहे. त्याला केंद्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे. नियामनुसार संरक्षित क्षेत्राच्या शंभर मीटर परिसरात इतर बांधकाम व अतिक्रमण करण्यास मनाई आहे. या नियमांचा दाखल देऊन पुरातत्त्व विभागाने महापालिकेला नोटीस बजावली होती. त्यात सात दिवसांच्या आत अतिक्रमण हटवण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार अम्मा स्मारकाचे अतिक्रमण हटवण्यात आले

illegal Amma Memorial construction And Kishor Jorgewar
Kishor Jorgewar controversy : भाजपच्या जोरगेवारांचा चौकासाठी 'अम्मा'नामा; शहीदाच्या मुलाच्या तक्रारीची मुख्यमंत्री दखल घेणार?

FAQs :

प्रश्न 1: प्रशासनाने कोणती कारवाई केली?
👉 जोरगेवार यांच्या आईच्या नावाने उभारण्यात आलेले अम्मा स्मारक अवैध ठरवून हटवले.

प्रश्न 2: या कारवाईमुळे काय परिणाम झाले?
👉 जोरगेवार यांच्या राजकीय प्रतिमेला धक्का बसला असून जिल्ह्यात वादंग पेटला आहे.

प्रश्न 3: जोरगेवार कोण आहेत?
👉 किशोर जोरगेवार हे चंद्रपूरचे आमदार असून "मी म्हणेल तो कायदा" या विधानामुळे ते चर्चेत राहिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com