Chandrapur Politics : काँग्रेस कर्मानं सत्ता घालवणार? वडेट्टीवार मातोश्रीवर अन् धानोरकर दिल्लीला जाताच मुनगंटीवार लागले कामाला

Chandrapur Mahapalika Mayor Election : चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसमधील अंतर्गत वाद आणि भाजपमधील गटनेता ठरत नसल्यामुळे सत्ता स्थापन रखडली असून, महापौर निवडीवर मोठा संभ्रम कायम आहे.
Uncertainty prevails in Chandrapur Municipal Corporation as Congress and BJP struggle with internal factionalism, delaying mayor and group leader selection after civic election results.
Uncertainty prevails in Chandrapur Municipal Corporation as Congress and BJP struggle with internal factionalism, delaying mayor and group leader selection after civic election results.sarkarnama
Published on
Updated on

Chandrapur News : चंद्रपूर महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन 10 दिवस उलटल्यानंतरही चंद्रपूर महापालिकेत अद्याप सत्ता स्थापन करण्यासाठी कोणीच दावा केलेला नाही. काँग्रेसमधील भांडणे उफाळून आली आहेत. महापौरपदाच्या वादात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी 13 नगरसेवकांचा स्वतंत्र गट स्थापन केला आहे. त्यानंतर त्यांना तातडीने दिल्लीला बोलावण्यात आले. तर वडेट्टीवार यांनी थेट मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. पण अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही.

दुसरीकडे भाजपमधील अंतर्गत धुसफूस आहे. त्यामुळे भाजपनेही अद्याप गट स्थापन केला नाही. गटनेत्याच्या नावावर एकमत होत नसल्याने गटनोंदणीची प्रक्रिया थांबली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार हे एकाच विमानाने मुंबईला गेले असून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. त्यांच्या भेटीत भाजपचे महापौरपद आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महापौरपदाच्या मागणीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

66 सदस्यसंख्या असलेल्या चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसचे सर्वाधिक 27 नगरसेवक निवडून आले आहेत. तर भाजपकडे 23 सदस्य आहेत. काँग्रेसला बहुमतासाठी 6 तर भाजपला 10 नगरसेवकांची गरज आहे. उद्धव ठाकरे सेनेने वंचित आघाडीला सोबत घेऊन 8 नगरसेवकांचा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आणखीच पेच वाढला आहे. जनविकास सेनेचे 2 आणि 2 अपक्ष नगरसेवक असले तरी उद्दव सेनेने महापौरपदाची मागणी केली आहे. त्यामुळे काँग्रेस आणि भाजप दोघांचीही अडचण झाली आहे.

त्याचवेळी खासदार धानोरकर यांच्या गटाला महापौरपद देण्याचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मान्य केले आहे. त्यामुळे त्यांनीही बहुमत गोळा करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. आमच्यातील मतभेद संपले असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जाहीर केले असले, तरी सुप्त संघर्ष सुरूच आहे. त्यांचे समर्थक नगरसेवक अद्याप काँग्रेसने स्थापन केलेल्या गटात सहभागी झालेले नाहीत.

Uncertainty prevails in Chandrapur Municipal Corporation as Congress and BJP struggle with internal factionalism, delaying mayor and group leader selection after civic election results.
Chandrapur News : सुधीरभाऊंच्या हातातून चंद्रपूरही निसटणार? जोरगेवार 'मुनगंटीवारांच्या' वर्चस्वावर अखेरचा घाव घालणार

अपक्ष निवडून आलेले दोन नगरसेवक हेसुद्धा वडेट्टीवार यांचे समर्थक आहेत. यात खासदार धानोरकर यांना दिल्लीतून बोलवणे आले आहे. चंद्रपूरमधील वादावरच त्यांची चर्चा होणार असल्याचे समजते. त्यानंतरच पुढचा निर्णय होणार असल्याची चर्चा आहे. हे बघता आणखी काही दिवस काँग्रेसला प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Uncertainty prevails in Chandrapur Municipal Corporation as Congress and BJP struggle with internal factionalism, delaying mayor and group leader selection after civic election results.
Chandrapur mayor election: दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ; ठाकरेंचा महापौर बसणार? 'मातोश्री'वरील बैठकीत नगरसेवक अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यावर ठाम

भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्यातील गटबाजीमुळे चंद्रपूर महापालिका भाजपला गमवावी लागली हे स्पष्ट झाले आहे. उमेदवारी वाटपावरून दोन्ही नेत्यांमधील मतभेद उफाळून आले होते. त्यानंतर प्रदेशाध्यक्षांनी दिलेल्या यादीतही फेरफार झाली होती. याचा फटका भाजपच्या उमेदवारांना बसला.

एवढे होऊनही गटनेतेपदावरून भाजपमध्ये नव्या वादाला तोंड फुटले आहे. हे प्रकरण मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात टाकण्यात आले आहे. मुनगंटीवार, जोरगेवार आणि आमदार बंटी भांगडिया हे मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे समजते. तो पर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत भाजपचीही नोंदणी होणार नसल्याचे दिसून येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com