Congress News : चंद्रपूर काँग्रेसमध्ये ‘समाजवाद'; महिला अध्यक्षांनी दिला राजीनामा

Political News : लोकसभेच्या निवडणुकीपासून काँग्रेसमध्ये वडेट्टीवार आणि धानोरकर गटात मोठा वाद सुरू आहे. खासदार झाल्यानंतर प्रतिभा धानोरकर यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आपण ठरविणार असल्याचे सांगून थेट पक्षातील नेत्यांनाच आव्हान दिले होते.
Pratibha Dhanorkar, Namrta Acharay, Vijay wadettiwar
Pratibha Dhanorkar, Namrta Acharay, Vijay wadettiwarSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : काँग्रेसचे नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील वाद ताजा असताना आता चंद्रपूर जिल्ह्याच्या महिला काँग्रेस अध्यक्षा नम्रता आचार्य-ठेमस्कर यांनी पदाचा आणि पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी थेट खासदारांवर जातीवादाचा आरोप करून जिल्ह्यातील संपूर्ण काँग्रेसला कौटुंबिक मालमत्ता केली असल्याची टीका केली आहे. त्यामुळे आता येथे नव्या वादाला तोंड फुटणार असल्याचे दिसून येते.

लोकसभेच्या निवडणुकीपासून काँग्रेसमध्ये (Congress) वडेट्टीवार आणि धानोरकर गटात मोठा वाद सुरू आहे. खासदार झाल्यानंतर प्रतिभा धानोरकर (Prathibha Dhanorkar) यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आपण ठरविणार असल्याचे जाहीरपणे सांगून थेट पक्षातील नेत्यांनाच आव्हान दिले होते. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खासदारांना तिकीट वाटपाचा अधिकार नसतो असे सांगून त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर खासदार धानोरकर यांनी विजय वडेट्टीवार यांच्या ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात कुणबी समाजाच्या मेळाव्यातील वादग्रस्त वक्तव्य चांगलेच गाजले होते. (Congress News)

चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही अल्पसंख्य आपल्यावर राज्य करीत आहेत. आता परिवर्तन करण्याची वेळ आली असल्याचे आवाहन समाज मेळाव्यात केले होते. त्यावर चांगलाच वाद उफाळून आला होता. वडेट्टीवार यांची तक्रार काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली होती. त्यावरून खासदार धानोरकर यांनी दिल्लीत बोलावण्यात आले होते. वरिष्ठ नेत्यांनी समज दिल्याचेही समोर आले होते.

विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी रमेश चेन्निथाला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह अनेक नेत्यांच्या उपस्थितीत चंद्रपूरमध्ये काँग्रेसचा मेळावा घेण्यात आला होता. यावेळी वडेट्टीवार आणि धानोरकर यांना एकत्र बसवून आपसातील वाद मिटवण्यास सांगण्यात आले होते. मात्र नम्रता आचार्य-ठेमस्कर यांच्या राजीनाम्याने वाद मिटण्याऐवजी अधिकच उफाळून आला असल्याचे स्पष्ट होते.

Pratibha Dhanorkar, Namrta Acharay, Vijay wadettiwar
Congress News : काँग्रेसचं जागावाटप कधी? विजय वडेट्टीवारांनी थेट तारीखच सांगितली

खासदार धानोरकर या चंद्रपूर जिल्हा काँग्रेस स्वतःच्या मालकीची समजतात. फक्त आपल्या समाजाला प्रतिनिधित्व देतात. इतर समाजाचे कार्यकर्ते त्यांना चालत नाही. आपला भाऊ आणि मुलाला त्यांना प्रस्थापित करायचे असल्याचा खळबळजनक आरोप नम्रता आचार्य यांनी केला आहे.

वरोरा विधानसभा मतदारसंघातून आपण इच्छुक म्हणून उमेदवारी अर्ज पक्षाकडे भरला होता. तेव्हापासून त्यांनी आपल्याला अपमानास्पद वागणूक देणे सुरू केले. जेवढे जास्त उमेदवार अर्ज भरतील तेवढा निधी पक्षाकडे जमा होईल, असे सांगून त्यांनी सर्वांची खिल्ली उडवली. त्यामुळे आपण पक्षाचा आणि पदाचा राजीनामा दिल्याचे नम्रता यांनी सांगितले. त्या वडेट्टीवार यांच्या समर्थक म्हणून ओळखल्या जातात.

Pratibha Dhanorkar, Namrta Acharay, Vijay wadettiwar
Rohit Pawar : आमदार पवारांनी सरकारला विनंती केली; सरकार किती मनावर घेणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com