Chandrapur Congress : विदर्भात रातोरात नगरसेवक फुटले! विजय वडेट्टीवार 'डाव' उलटवण्याच्या तयारीत; खासदार धानोरकरांच्या वर्चस्वाला जोरदार धक्का?

Chandrapur Congress : चंद्रपूर काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष पुन्हा उफाळला असून, वडेट्टीवार गटात तीन नगरसेवक दाखल झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे धानोरकर गटाचे १३, तर वडेट्टीवार गटाचे १४ नगरसेवक झाल्याचे समजते.
Chandrapur Congress Crisis | Vijay Wadettiwar and Pratibha Dhanorkar Groups
Chandrapur Congress Crisis | Vijay Wadettiwar and Pratibha Dhanorkar GroupsSarkarnama
Published on
Updated on

Chandrapur Congress : चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष पुन्हा उफाळून येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. नवे गटनेते सुरेंद्र अडबाले यांना हटविण्यासाठी आमदार विजय वडेट्टीवार गटाने हालचाली सुरू केल्याची माहिती आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार प्रतिभा धानोरकर गटातील तीन नगरसेवक वडेट्टीवार यांच्या गोटात दाखल झाल्याचे समजते. बुधवारी रात्रीच त्यांना चंद्रपूरबाहेर हलविण्यात आल्याची चर्चा असून, आता धानोरकर गटाकडे १३, तर वडेट्टीवार गटाकडे १४ नगरसेवकांचे संख्याबळ झाल्याचे समजते.

चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेस २७नगरसेवकांसह सर्वांत मोठा पक्ष आहे. मात्र, नेत्यांतील अंतर्गत कलहाचा लाभ भाजपने उचलला आणि सत्ता स्थापन केली. तत्पूर्वी खासदार धानोरकर आणि आमदार वडेट्टीवार या दोन्ही गटांच्या नगरसेवकांनी एकत्र येत राजेश अडूर यांची गटनेतेपदी निवड केली होती. मात्र, स्थायी समितीत खासदार धानोरकर यांच्या गटातील नगरसेवकांची नावे अडूर यांनी दिली नाहीत. तेव्हापासून अडूर यांना पदावरून हटविण्याच्या हालचाली पक्षातील विरोधी गटाकडून सुरू झाल्या.

अखेर बहुमताचा आकडा गाठण्यात आला आणि १६ नगरसेवकांच्या पाठिंब्याने सुरेंद्र अडवाले यांची गटनेतेपदी निवड झाली. गटनेता बदलण्याचे हे नाट्य जवळपास दीड महिना चालले. हे प्रकरण न्यायालयातही गेले. भाजपमधील अंतर्गत वादामुळे पाच महिन्यांचा कालावधी उलटूनही महानगरपालिकेत स्वीकृत सदस्यांच्या नियुक्त्या झालेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर गटनेता बदलून आपल्या गटातील व्यक्तींना स्वीकृत सदस्य म्हणून पाठविण्यासाठी आमदार वडेट्टीवार गटाने प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे.

Chandrapur Congress Crisis | Vijay Wadettiwar and Pratibha Dhanorkar Groups
Congress politics : राहुल गांधींकडून ओवेसींना पहिला मोठा झटका; बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

अडबाले यांना गटनेतेपदी विराजमान करण्यात महत्त्वाची भूमिका बजाविणारे काँग्रेसचे नगरसेवक महानंदा वाळके, विनोद लभाने आणि आकाश मानकर यांनी खासदार प्रतिभा धानोरकर गटाला जय महाराष्ट्र केल्याचे समजते. मात्र, त्यांच्या भूमिकेतील अचानक झालेल्या बदलाचा 'अर्थ' अद्याप अनेकांना लागलेला नाही. त्यांना बुधवारी रात्री चंद्रपूर शहराबाहेर हलविण्यात आल्याचेही समजते.

Chandrapur Congress Crisis | Vijay Wadettiwar and Pratibha Dhanorkar Groups
Rahul Gandhi news : वडिलांचं डोकं फोडलं, आरोपी मंत्र्यांमुळे मोकाट, मला मदत करा! निशूने आवाज उठवताच राहुल गांधींनी दिला आधार, दिल्लीत घमासान

गटनेता बदलण्यासाठी साधे बहुमत गृहीत धरल्यास १४ नगरसेवकांची आवश्यकता आहे. हा आकडा गाठण्यासाठी आवश्यक जुळवाजुळव वडेट्टीवार गटाने केल्याचे दिसत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत गटनेता बदलाच्या राजकीय नाट्याच्या दुसऱ्या अंकाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com