Gadchandur EVM break : 'नगारा' चिन्हा समोरील बटन दाबलं अन् 'कमळा'चा लाईट लागला, संतापलेल्या मतदाराने थेट 'ईव्हीएम'च फोडलं

municipal election clash Gadchandur : मतदानाच्या दिवशी अनेक ठिकाणी विविध पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते आमने-सामने आले तर काही ठिकाणी थेट बोगस मतदारांना चोप दिल्याच्या घटना समोर आल्या. चंद्रपुरात तर निवडणुकीत मदत केली नाही म्हणून शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराने भाजप कार्यकर्त्याला मारहाण केल्याची घटना घडली.
A voter allegedly breaks an EVM at a Gadchandur
A voter allegedly breaks an EVM at a Chandrapur polling booth after claiming malfunction during voting. The tense situation added to the day’s Chandrapur election news.Sarkarnama
Published on
Updated on

Chandrapur News, 03 Dec : राज्यभरात काल नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी मतदान पार पडलं. मात्र मतदानाची दिवशी विविध जिल्ह्यांमध्ये निवडणुकीला गालबोट लावणाऱ्या घटना घडल्याचं समोर आलं.

अनेक ठिकाणी विविध पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते आमने-सामने आले तर काही ठिकाणी थेट बोगस मतदारांना चोप दिल्याच्या घटना समोर आल्या. चंद्रपुरात तर निवडणुकीत मदत केली नाही म्हणून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराने भाजप कार्यकर्त्याला मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला आहे.

तर दुसरीकडे चंद्रपूरच्या गडचांदूर येथे मतदाना दरम्यान एका मतदाराने चक्क ईव्हीएमच फोडल्याची खळबळजक घटना घडली आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार चंद्रपूरच्या गडचांदूर येथील प्रभाग क्रमांक 9 मधील आदर्श हिंदी सेमी इंग्लिश प्राथमिक विद्यालयातील मतदान केंद्रात ही घटना घडली.

A voter allegedly breaks an EVM at a Gadchandur
Local Body Elections : निवडणुकीत मदत केली नाही म्हणून शिवसेनेच्या उमेदवाराची भाजप कार्यकर्त्याला मारहाण, ऐन निवडणुकी दिवशी हायव्होल्टेज ड्रामा

राम दुर्गे असं ईव्हीएम फोडणाऱ्या मतदाराचं नाव आहे. तर राम दुर्गे यांच्यासह काही स्थानिक मतदारांनी आपण 'नगारा' या चिन्हा समोरील बटन दाबल्यानंतर कमळाचा लाईट लागत होता असा आरोप केला आहे. दरम्यान, पोलिसांनी राम दुर्गे यांना ताब्यात घेतल्यानंतर काही नागरिकांनी सकाळपासूनच ईव्हीएम मध्ये घोटाळा होता.

A voter allegedly breaks an EVM at a Gadchandur
PMO: मोदींचा ऐतिहासिक निर्णय! ७८ वर्षे जुनं कार्यालय आता ओळखलं जाणार ‘सेवा तीर्थ’

यामध्ये राम दुर्गे यांची काहीह चूक नसल्याचं म्हटलं. दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांनी मशिन फोडल्यानंतर नवीन ईव्हीएम लावून मतदान प्रक्रिया सुरू केली.आली. मात्र या घटनेमुळे पुन्हा एकदा मतदान प्रक्रियेवर अनेकांकडून संशय व्यक्त केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com