Chandrapur Mayor : भाजपचा महापौर बसवण्यासाठी काँग्रेसच्याच नेत्याची मदत; त्यांच्याच घरी पहिली बैठक : सुधीर मुनगंटीवारांचा नावासहित गौप्यस्फोट

Rahul Pugalia Congress : चंद्रपूर महापौर निवडणुकीत भाजपला काँग्रेसचे राहुल पुगलिया यांनी मदत केल्याचा गौप्यस्फोट सुधीर मुनगंटीवार यांनी केला. पहिली रणनीती बैठक पुगलिया यांच्या घरी झाल्याचे त्यांनी सांगितले.
Sudhir Mungantiwar addresses media, revealing Congress leader Rahul Pugalia’s support in BJP’s Chandrapur Mayor election strategy.
Sudhir Mungantiwar addresses media, revealing Congress leader Rahul Pugalia’s support in BJP’s Chandrapur Mayor election strategy.Sarkarnama
Published on
Updated on

Chandrapur Mayor : भाजपचे 23 नगरसेवक तर काँग्रेसचे 27 नगरसेवक निवडून आले असताना दोन्ही पक्षाकडे बहुमतचा आकडा नव्हता. त्यामुळे इतरांची मदत घेणे आवश्यक होते. आम्ही संधी साधली. संधीचे सोने केले. त्यामुळे आमचा महापौर विजयी झाला. चंद्रपूरचा विकास करायचा असेल तर भाजपचा महापौर होणे आवश्यक असे अनेकांचे मत होते. यासाठी काँग्रेसचे नेते व माजी खासदार नरेश पुगलिया यांचे सुपुत्र राहुल पुगलिया यांनी आम्हाला मदत केल्याचा गौप्यस्फोट भाजपचे नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज माध्यमांशी बोलताना केला.

काँग्रेसमधीलच अनेक नेत्यांना काँग्रेसचा महापौर होऊ नये असे वाटत होते असे सांगताना मुनगंटीवार म्हणाले, आमची पहिली एकत्रित बैठक पुगलिया यांच्याच घरी झाली. आम्ही काँग्रेस विचारधारेचे आहोत. आमचे हृदय काँग्रेसी आहे. असे असले तरी आम्हाला शहराचा विकास हवा आहे. त्यामुळे आम्ही भाजपला मदत करायला तयार आहोत असे त्यावेळी पुगलिया म्हणाले.

त्यांनी आपला शब्द पाळला. भाजपचा महापौर निवडून आल्यानंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी बॅनर, पोस्टरबाजी करून श्रेय घेण्याचा प्रयत्न केला या प्रश्नावर मुनगंटीवार यांनी हास्यास्पद प्रकार अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

उद्धव सेनेशी लेखी करार केला आहे. याची माहिती सर्वांना आहे. चंद्रपूरच्या जनेतेलाही सर्वकाही ठाऊक आहे. अशा पद्धतीने श्रेय घेण्याची कोणी धडपड करीत असेल तर त्याचा काही फायदा होत नाही असा टोलाही मुनगंटीवार यांनी जोरगेवार यांना लगावला. काही नेत्यांना भाजपचा महापौर होईल असे वाटत नव्हते. एवढेच नव्हे तर भाजपचा महापौर होऊ नये अशी इच्छाही ते बाळगून होते. पक्षाकडे त्यांनी महापौरपदाचा उमेदवार मागितला नव्हता, असे सांगून मुनगंटीवार यांनी नाव न घेता जोरगेवारांना टोमणा मारला.

Sudhir Mungantiwar addresses media, revealing Congress leader Rahul Pugalia’s support in BJP’s Chandrapur Mayor election strategy.
Chandrapur Mayor Politics: महापौरपद हिसकावले; आता भाजपचा काँग्रेसवर सायकॉलॉजिकल स्ट्राइक!

संगीता खांडेकर यांचे नाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेनंतरच निश्चित करण्यात आले होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तसेच अधिकृत पत्र काढले होते. हा पक्षादेशच होता. असे असतानाही आमदार जोरगेवार यांनी आपल्या समर्थकाला महापौरपदासाठी अर्ज दाखल करायला लावला. काही त्रुटी निर्माण झाल्यास भाजप उमेदवाराचा अर्ज रद्द झाल्यास पर्याय म्हणून आपण अर्ज दाखल करायला लावला असल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्यांना अर्ज बाद होण्याची एवढीच भीती होती तर उपमहापौरपदासाठी का अर्ज दाखल केला नाही अशी विचारणा त्यांनी आमदार जोरगेवार यांना केली.

Sudhir Mungantiwar addresses media, revealing Congress leader Rahul Pugalia’s support in BJP’s Chandrapur Mayor election strategy.
Chandrapur Mayor : भाजप अन् ठाकरेंच्या जिल्हाध्यक्षांनी कारमध्येच फोडली युतीची सुपारी; चंद्रपूरातील काँग्रेसच्या गेमची Inside Story

यादी बदलण्यासाठी कारवाई होणार

महापालिकेच्या निवडणुकीत भाजप उमेदवारांची यादीही प्रदेशाध्यक्षांनी निश्चित केली होती. त्यानंतरही शहराध्यक्षांनी त्यात बदल केले. काही उमेदवारांची नावे कापून समर्थकांची नावे घुसवली. त्यावरून प्रदेशाध्यक्षांनी चंद्रपूर शहराध्यक्षांची तातडीने हकालपट्टी केली. चंद्रपूर भाजपमध्ये सुरू असलेली गटबाजी सर्वांच्या निदर्शनास आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याही हा प्रकार लक्षात आला आहे. ते याची निश्चितच दखल घेतील आणि कारवाई करतील असा विश्वासही सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com