Chandrapur Mayor : ठाकरेसेना अन् भाजपमध्ये महापौरपदासाठी '6 खोक्यांची' डील? मनसेच्या आरोपांवर चंद्रपूरच्या जिल्हाध्यक्षांचं प्रतिआव्हान

Chandrapur Municipal Corporation : चंद्रपूर महापौर निवडणुकीत भाजप-उबाठा युतीवर ‘6 खोके’ डीलचा आरोप झाला. जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे यांनी आरोप फेटाळत पुरावे द्यावेत, अन्यथा माफी मागावी, असे प्रतिआव्हान दिले.
Chandrapur Municipal Corporation
Chandrapur Municipal CorporationSarkarnama
Published on
Updated on

Chandrapur Municipal Corporation News : चंद्रपूर महानगरपालिकेच्या सत्ता स्थापनेत भाजप आणि शिवसेना (उबाठा) एकत्र आल्यानंतर त्याचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संदीप देशपांडे यांनी चंद्रपुरात भाजपने उबाठाच्या नगरसेवकांना प्रत्येकी एक कोटी आणि अपक्षांना पन्नास लाख रुपये दिल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. त्याला उबाठाचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. देशपांडे यांनी त्यांच्या सूत्रांकडून पुरावे मागवावेत. मी स्वतः आणि आमचे नगरसेवक आपल्या पदाचा राजीनामा देऊ; अन्यथा देशपांडे यांनी जाहीर माफी मागावी, असे आव्हान गिऱ्हे यांनी दिले.

चंद्रपूर महानगरपालिकेत शिवसेना (उबाठा) 6 आणि वंचितचे 2 नगरसेवक एकत्र होते. त्यानंतर त्यांच्यासोबत 2 अपक्ष आणि एमआयएमचा 1 नगरसेवक गेला. काँग्रेसकडे मित्रपक्षांसह 30 संख्याबळ आहे. भाजपचे 24 सदस्य निवडून आले. उबाठा आणि अपक्ष सोबत गेल्याने चंद्रपुरात भाजपचा महापौर निवडून आला.

याबाबत बोलताना, आम्ही काँग्रेसकडे अडीच वर्षांसाठी महापौरपदाची मागणी केली. त्यासंदर्भात आमदार विजय वडेट्टीवार आणि सुनील केदार यांच्याकडे बैठका झाल्या. ते महापौरपद देण्यास इच्छुक होते. मात्र खासदार प्रतिभा धानोरकर यांनी विरोध केला. त्यांनी महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून निवडणुकीत सोबत घेण्यासही नकार दिला होता, असा आरोप संदीप गिऱ्हे यांनी केला.

शेवटच्या दिवसांपर्यंत वडेट्टीवार यांच्याशी चर्चा सुरू होती. मात्र प्रत्यक्ष महापौर पदाच्या निवडणुकीस अवघा अर्धा तास शिल्लक असताना काँग्रेसकडून नकार आला. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनीही काँग्रेससोबत राहण्यास सांगितले होते. मात्र काँग्रेसच्या खासदार धानोरकर यांच्यामुळे चर्चा फिस्कटली. त्यामुळे नाईलाजाने भाजपकडे जावे लागले. अगदी वेळेवर हा निर्णय झाल्यामुळे वरिष्ठांना तत्काळ माहिती देता आली नाही. मात्र निवडणूक संपताच पक्षाचे नेते वरुण देसाई आणि सुषमा अंधारे यांना माहिती देण्यात आली, असे गिऱ्हे यांचे म्हणणे आहे.

Chandrapur Municipal Corporation
Chandrapur Mayor : भाजपचा महापौर बसवण्यासाठी काँग्रेसच्याच नेत्याची मदत; त्यांच्याच घरी पहिली बैठक : सुधीर मुनगंटीवारांचा नावासहित गौप्यस्फोट

दरम्यानच्या काळात भाजपसोबत कोणत्याही औपचारिक बैठका झाल्या नाहीत. त्यांच्या नेत्यांनी मोबाईलवर संपर्क साधला होता. आम्ही भाजप आणि काँग्रेसविरोधात निवडणूक लढवली होती. त्यामुळे महापौरपद देईल त्याच्यासोबत जाण्याचा निर्णय नगरसेवकांनी घेतला. भाजपने सव्वा वर्षासाठी महापौरपद, स्थायी समिती सभापतीपद आणि उपमहापौरपद देण्यास होकार दिला. त्यामुळे त्यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला.

Chandrapur Municipal Corporation
Chandrapur Mayor Politics: महापौरपद हिसकावले; आता भाजपचा काँग्रेसवर सायकॉलॉजिकल स्ट्राइक!

आम्हाला काँग्रेसकडून मान-सन्मान मिळत नसेल, तर त्यांच्यासोबत का जावे? असा सवाल गिऱ्हे यांनी उपस्थित केला. मनसेचे संदीप देशपांडे बिनबुडाचे आरोप करत आहेत. एक कोटी रुपये नगरसेवकांनी घेतले असते, तर एखाद्या फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये भाजपसोबत डील झाली असती. रस्त्यावर आम्ही आमच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केली. देशपांडे यांनी पुरावे द्यावेत. मी स्वतः आणि आमचे नगरसेवक राजीनामा देऊ. ही शिवसेनेच्या स्वाभिमानाची लढाई होती. त्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला, असा खुलासा गिऱ्हे यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com