Vidhan Sabha Election 2024: विधानसभेची निवडणूक जाहीर होताच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक आयोगावर टीका करणे सुरू केले आहे. भाजपच्या फायद्यासाठी एकाच टप्प्यात निवडणूक जाहीर करण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे. या आरोपाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
महाविकास आघाडीच्या(Mahavikas Aaghadi) नेत्यांना फक्त टीका करणे आणि विरोध करणे एवढेच ठाऊक आहे. लोकसभेची निवडणूक पाच टप्प्यात घेण्यात आली होती. त्यावेळीसुद्धा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हीच टीका केली होती. आता एकाच टप्प्यात निवडणुका जाहीर केल्या आहेत. तरीही त्यांची टीका कायमच आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांचे किती टप्प्यात निवडणुका घेतल्या म्हणजे समाधान होईल? असा टोला बावनकुळे यांनी लगावला.
विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करणे हे समजू शकतो. मात्र आयोगावर टीका करणे म्हणजे ते पराभवाच्या मानसिकतेत आहे हे दिसून येते. त्यांचा पराभव निश्चित आहे. त्यामुळे आता आयोगावर, निकालानंतर ईव्हीएमला ते दोषी ठरवतील असेही बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) म्हणाले. आमची निवडणुकीची तयारी यापूर्वीच झाली आहे. महायुतीचे सध्या आहेत त्या पेक्षा जास्त आमदार निवडूण येतील. अशी तयारी आम्ही केली आहे.
डबल इंजिन सरकार महाराष्ट्राची गरज आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी आम्ही मत मागणार आहोत. पुढचे पाच वर्ष विकासाचे पर्व या महाराष्ट्रात येण्याकरिता बुथ स्तरावर संघटनेचे काम सुरू आहे. बुधवारी भाजपच्या(BJP) केंद्रीय निवडणूक समितीची बैठक बोलावण्यात आली आहे. त्यात आमच्या ज्या सिटिंग सीट आहेत, त्यावर चर्चा करू. प्रेझेंटेशन झाल्यानंतर समिती पुढचा निर्णय घेईल, असे बावनकुळे यांनी सांगितले.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.