Chandrashekhar Bawankule News : माजी आमदाराला भाजपने केले तडकाफडकी निलंबित; बंडखोरांना बावनकुळेंचा कडक इशारा!

Ramtek bjp News : ... याची गंभीर दखल प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली. ; जाणून घ्या,नेमकं काय आहे प्रकरण?
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama
Published on
Updated on

Chandrasekhar Bawankule on rebellious : महायुतीमध्ये जागा वाटपावरून खटके उडत आहेत. भाजपचे कार्यकर्ते शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला स्वीकारण्यास तयार नसल्याचं दिसत आहे. यातच शिवसेनेने रामटेक विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार आधीच जाहीर केल्याने भाजपमध्ये मोठा वाद उफाळून आला आहे.

यास जाहीर विरोध करणारे आणि बंडाचा इशारा देणारे रामटेक विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांना भाजपातून तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे Bawankule) यांनी या माध्यमातून बंडखोरांना एक प्रकारे इशाराच दिला आहे.

Chandrashekhar Bawankule
Election Commission on Rashmi Shukla : रश्मी शुक्लांबाबत काँग्रेसच्या 'त्या' मागणीवर अखेर निवडणूक आयोगाने स्पष्ट केली भूमिका!

रेड्डी आणि रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल परंपरागत विरोधक आहेत. 2014च्या निवडणुकी रेड्डी यांनी जयस्वाल यांचा पराभव केला होता. त्यानंतरच्या 2019च्या निवडणुकीत जयस्वाल यांनी अपक्ष लढून पराभवाची परतफेड केली होती. यावरून दोघांमधील वाद आणखीच वाढला होता. जयस्वाल महायुतीत सहभागी झाले तेव्हापासूनच ते भाजपात येणार असल्याची चर्चा होती. यावरून रेड्डी यांचे भाजपच्या(BJP) नेत्यांसोबत अनेकदा खटके उडाले होते.

Chandrashekhar Bawankule
BJP Vs Congress : समान संधीचे सोने करण्याचे भाजप-काँग्रेसपुढे आव्हान!

आता जयस्वाल यांनी शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला आहे. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने(Shivsena) महायुतीच्या उमेदवारांची घोषणा व्हायच्या आतच जयस्वाल यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे रामटेकमध्ये मोठा वाद उफाळून आला.

रेड्डी यांनी माध्यमांसमोर जाऊन जयस्वाल यांची उमेदवारी खपवून घेतली जाणार नाही, प्रसंगी बंडखोरी करू असा इशारा पक्षाला दिला होता. याची गंभीर दखल प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली.

नागपूरमध्ये येताच त्यांनी रेड्डी यांच्या निलंबनाची घोषणा केली. पक्षविरोधी कारवाया करणे, पक्षाचे अंतर्ग विषय माध्यमांसमोर आणि सार्वजनिक बैठकांमध्ये मांडणे, विरोध करणे, पक्षाच्या शिस्तीचे उल्लंघन करणे असा ठपका रेड्डी यांच्यावर ठेवण्यात आला आहे. महायुतीच्या विरोधात जे जाहीर बंड करतील, विरोधात वक्तव्य करतील त्या सर्वांच्या विरोधात कारवाई केली जाणार असल्याचा इशारा बावनकुळे यांनी दिला आहे.

(Edited by -Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com