Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा दावा; म्हणाले,'महायुती तुटली तरी 51 टक्के मते मिळणारच...'

Mahayuti Politics: मुंबई शहर बदलत आहे आणि डबल इंजिन सरकारमुळे जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मुंबई आम्हाला निवडून देईल, असेही बावनकुळे म्हणाले. सर्व्हेवर चर्चा करणे योग्य नसले, तरी महायुतीला मुंबईत 51 टक्के मतांचा पाठिंबा मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक भाजप स्‍वबळावर लढत आहे. शिंदे सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपले उमेदवार उभे केले आहेत. याशिवाय मोठ्या प्रमाणात सर्वच पक्षात बंडखोरी झाली असल्याचे दिसून येते. हे बघता मतविभाजनाचा धोकाही वर्तविला जात आहे. असे असले तरी भाजप महायुतीला 51 टक्के मते मिळतील असा दावा भाजपचे नेते आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केला.

ज्यांनी बंडखोरी केली त्यांच्यासोबत आमची चर्चा सुरू आहे. उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी मोठ्या प्रमाणात बंडखोरी कमी झाल्याचे दिसेल. यावेळी त्यांनी महापालिकेची निवडणूक मात्र आम्ही महायुतीने लढणार असल्याचे सांगितले

भाजपमधील बंडखोरीबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले, तिकीट मिळाले नसल्याने काही लोक नाराज आहे. त्यांनी निवडणुकीसाठी दावेदारी दाखल केली आहे. आम्ही त्यांना विनंती करून उमेदवारी मागे घेण्यास प्रवृत्त करू. सात ते आठ वर्षानंतर निवडणुका होत असल्याने कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढतात. निवड प्रक्रियेत कधी एखाद्याला न्याय मिळतो, तर एखाद्याला नाही. परंतु, आमचा कार्यकर्ता पक्षनिष्ठ आहे

आमचे जिल्हा व विभागीय पदाधिकारी अपक्ष उमेदवारी दाखल केलेल्यांसोबत बोलत आहेत. अनेक जण आपली उमेदवारी मागे घेतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे एकत्र बसून महायुती (Mahayuti) म्हणून आम्ही महापालिका निवडणूक लढवणार आहोत.

Chandrashekhar Bawankule
Raj Thackeray News: राज ठाकरेंनी खडसावलेल्या 'मुळशी पॅटर्न' फेम अभिनेत्याचा पंधरा दिवसांच्या आतच मोठा निर्णय, मनसेला धक्का

मुंबई शहर बदलत आहे आणि डबल इंजिन सरकारमुळे जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मुंबई आम्हाला निवडून देईल, असेही बावनकुळे म्हणाले. सर्व्हेवर चर्चा करणे योग्य नसले, तरी महायुतीला मुंबईत 51 टक्के मतांचा पाठिंबा मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

नगर पालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुती करण्याचे अधिकार स्थानिक नेत्यांना भाजपने दिले होते. सर्वच पक्षात इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे कोणी युती करण्याच्या भानगडीत पडले नाही.

Chandrashekhar Bawankule
Jaykumar Gore: मंत्री जयकुमार गोरेंना घरातूनच आव्हान; शेखर गोरेंनी पुन्हा तलवार काढली, आता 'बार्गेनिंग'कडे लक्ष

प्रत्येकच पक्षाच्या नेत्यांनी युती केली जाईल, चर्चा सुरू आहे असे दावे केले होते. मात्र, युतीसाठी प्रामाणिकपणे कोणीच पुढाकार घेतला नाही हे या निवडणुकीत दिसून आले. दुसरीकडे काँग्रेस तसेच महाविकास आघाडीनेसुद्धा या निवडणुकीत युती केलेली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com