Chandrashekhar Bawankule News : बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार; म्हणाले, ‘ती’ फडणवीसांची नव्हे, तर तुमची अवस्था !

Uddhav Thackeray : ही फडणवीसांची नव्हे तर तुमची अवस्था झाली आहे.
Uddhav Thackeray and Chandrashekhar Bawankule
Uddhav Thackeray and Chandrashekhar BawankuleSarkarnama
Published on
Updated on

Uddhav Thackeray group office bearers meeting : उद्धव ठाकरे गटाचा पदाधिकाऱ्यांचा मेळावा आज (ता. १८) मुंबईमध्ये झाला. या मेळाव्यात ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर बोचरी टिका केली. त्या टीकेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. (MLA Chandrasekhar Bawankule has given a strong reply)

वरळी येथे झालेल्या मेळाव्यात ठाकरे म्हणाले, ‘पहा देवेंद्रजी तुमची परिस्थिती फार हालाकीची आहे हो!, तुम्ही बोलताय हे ठीक आहे, पूर्वी एक जाहिरात यायची. सहनही होत नाही, सांगता ही येत नाही, त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस’, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना टोला लगावला. या टोल्याचा खरपूस समाचार आमदार बावनकुळे यांनी घेतला.

उद्धव ठाकरेंना सुनावताना आमदार बावनकुळे म्हणाले, ‘सहनही होत नाही, अन् सांगता ही येत नाही’, ही फडणवीसांची नव्हे तर तुमची अवस्था झाली आहे. तुमच्या नाकर्तेपणामुळे तुमचे लोक आजही पक्ष सोडून जात आहेत. एके काळी तुम्ही आमची कुळं काढली होती. पण आमची कुळं ही एका विचाराची पाईक राहिलेली कुळं आहेत, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे. यासंदर्भात त्यांनी एक ट्विट केले आहे.

ट्विटमध्ये आमदार बावनकुळे म्हणतात, ‘उद्धवजी तुम्ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांना तिलांजली देऊन त्यांनी स्थापन केलेली शिवसेना स्वतःच्या मुख्यमंत्रिपदासाठी उद्ध्वस्त केली. तुमच्या नाकर्तेपणामुळे आजही लोक तुमचा पक्ष सोडून जात आहेत आणि आता तुम्ही नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या नावाने खडे फोडत आहात. मोदी आणि शाह यांच्यावर टिका करण्याची तुमची लायकी आहे का, हे तपासून बघा.

Uddhav Thackeray and Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule News : ‘हे’ उद्धव ठाकरेंना मान्य आहे का? त्यांनी लंडनमधून व्हिडिओ पाठवावा !

आमची बावनकुळं (Chandrashekhar Bawankule) ही विचारांचे पाईक राहिलेली कुळं आहेत. तुमच्यासारखं खुर्चीसाठी हिंदुत्व सोडणारे हे कूळ नाही. याचा मला सार्थ अभिमान आहे. सांगता येत नाही आणि सहनही होत नाही, ही देवेंद्र फडणवीस यांची नाही, तर तुमची अवस्था आहे. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेबांनी उभा केलेला पक्ष उद्धवजी तुम्ही संपवून टाकला. वडिलांनी कमावलं आणि मुलानं खुर्चीसाठी गमावलं, हे महाराष्ट्रातील (Maharashtra) जनतेनं पाहिलं आहे.

त्यामुळे बाळासाहेबांच्या (Balasaheb Thackeray) विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी संपूर्ण आयुष्य देशासाठी देणाऱ्या मोदीजी आणि अमितभाईंवर टिका करू नये. तुमच्या सरकारच्या काळात १०० खोक्यांची वसुली अद्याप जनता विसरलेली नाही, हे ध्यानात घ्या.’

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com