

Shinde-Fadnavis government is working fast : भाजप-शिवसेना युतीमध्ये कुठलाही बेबनाव नाही. युती अगदी घट्ट आहे. जागावाटपही योग्य पद्धतीने होणार आहे. आमचे उमेदवार निवडून आणण्यासाठी जेवढे प्रयत्न आम्ही करू, त्याहीपेक्षा आमचे जास्त प्रयत्न शिवसेनेचे उमेदवार निवडून आणण्यासाठी असणार आहेत, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. (There is no controversy in the BJP-Shiv Sena alliance)
आज (ता. ९) सकाळी कोराडी येथे पत्रकारांशी बोलताना आमदार बावनकुळे म्हणाले, महाराष्ट्रात ४५पेक्षा जास्त लोकसभा आणि २००पेक्षा जास्त विधानसभा मतदारसंघात युतीचे उमेदवार आम्ही निवडून आणणार आहोत. आमच्याकडे केंद्र आणि राज्य सरकारच्या विकास कामांची शिदोरी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस यांचे सरकार वेगाने कामे करीत आहेत.
लवकरच आम्ही घर चलो अभियान सुरू करणार आहोत. लोकसभा निवडणुकीत आम्ही साडेतीन हजार घरी जाऊ.घरांमध्ये जाणार आहोत. महाविकास आघाडीला परास्त करून भाजप-शिवसेना युती निवडून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजप लवकर मंत्रिमंडळ विस्तार करत नसल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत आणि नाराजी व्यक्त करण्यासाठी किंवा भाजपवर दबाव टाकण्यासाठी ते सुटीवर काश्मीरला गेले असल्याचा आरोप होत आहे. याबाबत विचारले असता, सकाळी काहीतरी सेटिंग करून दिवसभर चालवण्यासाठी दिलेली ही बातमी आहे, असे बावनकुळे म्हणाले.
प्रत्येकाचा परिवार आहे, कुटुंब आहे. प्रत्येकाने कुटुंबासाठी वेळ काढला पाहिजे. राजकीय नेते आपला पूर्ण वेळ समाजाकरिता देतात आणि एखादवेळी कुटुंबीयांसमवेत दोन-चार दिवस सुटीवर नेते गेले, तर समाजही ही बाब समजून घेतो, असे ते म्हणाले. २०२४ मध्ये केंद्रात आपली सत्ता येणार आहे. तेव्हा ईडी कारवाई कुणा-कुणावर करायची, याची यादी तयार करून ठेवा, असे विनायक राऊतांना उद्देशून संजय राऊत म्हणाले. यावर बोलताना बावनकुळे म्हणाले, नितेश राणे ११.३० वाजता नागपूरला येत आहे. ते यावर उत्तर देतील. कारण राऊतांना उत्तर देण्यासाठी आम्ही नितेश राणेंवर जबाबदारी दिलेली आहे.
भाजपचे बजरंगबली कर्नाटकमध्ये चालले नाही, त्यामुळे महाराष्ट्रात (Maharashtra) भाजपने औरंगजेब उकरून काढला आहे, या संजय राऊतांच्या (Sanjay Raut) वक्तव्याबाबत विचारले असता, त्यांनी पुन्हा नितेश राणेंकडे बोट दाखवले. भाजपची निवडणूक प्रमुखांची यादी प्रसिद्ध झाली आहे. काही मतदारसंघांमध्ये ज्यांना निवडणूक प्रमुख केले, ते स्वतः लढण्यासाठी इच्छुक आहेत. याबाबत आमदार बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, ज्यांना-ज्यांना आम्ही निवडणूक प्रमुख केले, ते उमेदवारीच्या रेसमध्ये नाहीत. सक्षम आणि आक्रमक चेहरे आम्ही निवडणूक प्रमुख म्हणून दिलेले आहेत.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.